Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 46:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 राजेश्वर, सेनाधीश परमेश्वर, हे ज्याचे नाम तो म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, डोंगरामध्ये जसा ताबोर व समुद्राजवळ जसा कर्मेल तसा तो निश्‍चये येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे, तो राजेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसा डोंगरामध्ये ताबोर व जसा समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे तसा कोणीएक येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “ज्याचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे, ते महाराज म्हणतात, ‘माझ्या जीविताची शपथ,’ जो येणार आहे, तो पर्वतांमधील ताबोर पर्वतासारखा, समुद्राजवळील कर्मेलासारखा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 46:18
20 Iomraidhean Croise  

उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.


आमच्या उद्धारकर्त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे आहे.


ते तर आपणांस पवित्र नगराचे म्हणवतात व इस्राएलाच्या देवाचा आश्रय करतात; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे.


तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


जो याकोबाचा वाटा तो त्यांसारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;


तरीपण यहूदातले जे सर्व तुम्ही मिसर देशात राहत आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका : परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आपल्या थोर नामाची शपथ वाहिली आहे की अखिल मिसर देशात, ‘परमेश्वराच्या जीविताची शपथ,’ असे म्हणायला माझे नाम यहूदातल्या माणसांपैकी कोणाच्या मुखातून निघणार नाही.


मवाब ओसाड झाला आहे, त्याच्या नगरांवर लोक चढाई करून गेले आहेत, त्याचे निवडक तरुण वध पावण्यास खाली उतरून गेले आहेत, असे राजेश्वर म्हणतो; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर.


प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; त्याने ओतलेली मूर्ती प्रत्यक्ष लबाडीच आहे; त्यांच्यात मुळीच प्राण नाही.


मी त्याचे सरदार, त्याचे ज्ञानी, त्याचे अधिपती व नायब अधिपती, आणि त्याचे वीर ह्यांना मस्त करीन; ते कायमचे निद्रावश होतील, ते उठायचे नाहीत, असे सेनाधीश परमेश्वर, हे नाम धारण करणारा राजेश्वर म्हणतो.


कारण जो पर्वत निर्माण करतो, वारा उत्पन्न करतो, मनुष्याच्या मनातील विचार काय आहेत ह्याची त्याला जाणीव करून देतो, जो प्रभात अंधकारमय करतो आणि पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालतो त्याचे नाम परमेश्वर, सेनाधीश देव, हे आहे.”


आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करतो; असा फसवणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रांत माझ्या नावाची भीती धरतात, असे परमेश्वर म्हणतो.


‘पृथ्वीचीही’ वाहू नका, कारण ‘ती त्याचे पादासन आहे;’ यरुशलेमेचीही नका, कारण ती ‘थोर राजाची’ नगरी आहे.


जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच ज्ञानी देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन.


केदेशाचा राजा, कर्मेलातील यकनामाचा राजा,


त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश येथवर जाते आणि ती यार्देनेजवळ संपते; त्यांना ही सोळा नगरे व त्यांखालील खेडी मिळाली.


इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,


तिने अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश-नफताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना?


Lean sinn:

Sanasan


Sanasan