Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 46:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 “हे मिसर देशात विदित करा, मिग्दोलात जाहीर करा; नोफ व तहपन्हेस ह्यांत जाहीर करा; म्हणा, ‘उभा राहा, सज्ज हो, कारण तुझ्याभोवतालचे सर्वकाही तलवारीने खाऊन टाकले आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मिसरास कळवा आणि मिग्दोलात व नोफात ऐकू द्या. तहपन्हेस ते म्हणाले तू उभा राहा व सज्ज हो, कारण तुमच्या भोवती तलवारीने सर्व काही खाऊन टाकले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “इजिप्तमध्ये घोषणा करा, मिग्दोलमध्ये जाहीर करा; मेम्फीस व तहपनहेस या शहरांमध्येही जाहीर करा! ‘चला, सिद्ध व्हा, व मोर्चा बांधा, कारण तुमच्या सभोवतालच्यांना तलवार गिळंकृत करीत आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 46:14
23 Iomraidhean Croise  

तेव्हा अबनेर यवाबाला हाक मारून म्हणाला, “तलवारीला निरंतर भक्ष्य देत राहायचे काय? ह्याचा अंती परिणाम दुःखदायक होणार हे तुला ठाऊक नाही काय? आपल्या भाऊबंदांच्या पाठीमागे लागण्याचे सोडून द्या, अशी आज्ञा तू आपल्या लोकांना कोठवर करणार नाहीस?”


“इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र ह्यांच्यामध्ये असलेल्या पी-हहिरोथापुढे बाल-सफोनासमोर तळ द्यावा; त्यासमोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावेत.


तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”


सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत; नोफाचे सरदार फसले आहेत; मिसरी गोत्रांची कोनशिला असे जे, त्यांनी मिसराला बहकवले आहे.


“अश्शूर तलवारीने पडेल पण मनुष्याच्या नव्हे; मनुष्याची नव्हे अशी तलवार त्याला ग्राशील; तो तलवारीपुढून पळेल; त्याच्या तरुण पुरुषांना वेठीस धरतील.


परमेश्वराची तलवार रक्ताने भरली आहे. मांद्याने, कोकरांच्या व बकर्‍यांच्या रक्ताने, एडक्यांच्या गुर्द्यांच्या मांद्याने पुष्ट झाली आहे; कारण परमेश्वर बसरा येथे यज्ञ, अदोमाच्या देशात महावध करणार आहे.


रानातल्या सर्व उजाड टेकड्यांवर लुटारू आले आहेत; कारण परमेश्वराची तलवार ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत देश ग्रासून टाकीत आहे; कोणत्याही मानवी प्राण्यास चैन नाही.


नोफ व तहपन्हेस ह्यांच्या लोकांनी तुला खाऊन टाकले आहे.


तुमच्या पुत्रांना मी ताडन केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत; फाडणार्‍या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांना खाऊन टाकले आहे.


जे यहूदी मिसर देशात, म्हणजे मिग्दोल, तहपन्हेस, नोफ व पथ्रोस प्रांत ह्यांत वस्ती करून होते त्यांच्याविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे :


तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचा आहे, आपल्या शत्रूंवर सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार खाऊन तृप्त होईल, ती त्यांचे रक्त पोटभर पिईल; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने उत्तरेच्या देशात फरात नदीच्या तीरी यज्ञ मांडला आहे.


मिसरनिवासिनी कन्ये, बंदिवासात जाण्यासाठी सामग्री तयार कर; कारण नोफ उजाड होईल, जळून निर्जन होईल.


मिसराविषयी : मिसर देशाचा राजा फारो नखो ह्याचे सैन्य कर्कमीशाजवळ फरात नदीच्या काठी होते, यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने त्या सैन्याचा निःपात केला त्याविषयी :


हे मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, अम्मोनपुत्रांविषयी व त्यांनी केलेल्या निंदेविषयी प्रभू परमेश्वर जे म्हणतो ते सांग; तलवार, वधासाठी तलवार उपसली आहे, फन्ना उडवण्यासाठी, चमकण्यासाठी ती पाजवली आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी नोफातील दैवतांचा उच्छेद करीन, मूर्ती नाहीतशा करीन आणि मिसर देशातला कोणीही ह्यापुढे अधिपती होणार नाही असे करीन; मिसर देश दहशतीने भरीन.


कारण पाहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत; मिसर त्यांना गोळा करील, मोफ त्यांना मूठमाती देईल; काटेकुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील, त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील.


पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तिचे रथ जाळीन, त्यांचा धूर निघेल, तुझ्या तरुण सिंहांना तलवार नष्ट करील; मी पृथ्वीवरून तुझे भक्ष्य नाहीसे करीन, तुझ्या जासुदांचा शब्द ह्यापुढे ऐकू येणार नाही.


वधलेल्यांचे, पाडाव केलेल्यांचे आणि शत्रूंच्या केसाळ मस्तकांचे रक्त पाजून मी माझ्या बाणांना मस्त करीन; माझी तलवार मांस भक्षील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan