Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 46:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 राष्ट्रांनी तुझी अपकीर्ती ऐकली आहे, तुझ्या आक्रोशाने पृथ्वी भरली आहे; कारण वीराला वीर टक्कर देऊन एकत्र पडत आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 राष्ट्रांनी तुझी बदनामी ऐकली आहे. पृथ्वी तुझ्या विलापाने भरली आहे, कारण सैनिक सैनिकाविरूद्ध अडखळत आहेत. ते दोघेही एकत्र पडतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 राष्ट्रे तुझ्या लज्जेची वार्ता ऐकतील; तुझ्या आक्रोशाने संपूर्ण पृथ्वी भरेल. तुझे योद्धे परस्परांवर अडखळून पडतील; दोघेही एकमेकांसोबत एकत्र पडतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 46:12
17 Iomraidhean Croise  

बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


मी मिसर्‍यांवर मिसरी उठवीन; प्रत्येक आपल्या भावाबरोबर व प्रत्येक आपल्या शेजार्‍याबरोबर, नगर नगराशी, राज्य राज्याशी लढेल.


बाहेर रस्त्यात द्राक्षारसास्तव ओरड चालली आहे, सर्व उत्सव मावळला आहे, पृथ्वीचा हर्ष लोपला आहे;


“यहूदा शोक करीत आहे, त्याच्या वेशी उदासवाण्या झाल्या आहेत; ते भूमीवर शोक करीत पडले आहेत; यरुशलेमेची आरोळी वर गेली आहे.


आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.


चपळ माणसाला पळून जाता येणार नाही, वीराला निसटून जाता येणार नाही; उत्तर दिशेस फरात नदीच्या तीरी ते ठोकर खाऊन पडत आहेत.


“परमेश्वर म्हणतो, पाहा, उत्तरेकडून पाणी चढत आहे, त्याचा मोठा लोंढा बनत आहे; देश व त्यातील सर्वकाही, नगर व त्यातले रहिवासी ह्या सर्वांना तो तुडवील; लोक आक्रोश करतील, देशातले सर्व रहिवासी हायहाय करतील.


हेशबोनाहून एलालेपर्यंत, याहसापर्यंत आरोळी होते, सोअरापासून होरानाईमापर्यंत, एग्लाथ-शलिशीयापर्यंत आरोळी होते; कारण निम्रीमाचे पाणी आटले आहे.


त्यांच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कापत आहे; आरोळी होत आहे, तिचा आवाज तांबड्या समुद्रात ऐकू येत आहे.


बाबेल घेण्याच्या वेळी झालेल्या आवाजाने पृथ्वी कापत आहे, तिचा आवाज राष्ट्रांमध्ये ऐकू येत आहे.”


बाबेलात आरोळीचा ध्वनी येत आहे! खास्द्यांच्या देशातून विध्वंसाचा गोंगाट होत आहे!


तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे, ते वाटेने ठोकरा खात आहेत, ते उतावळीने तटाकडे जात आहेत, तेथे मोर्चा उभारला आहे.


“त्या दिवशी मत्स्यवेशीतून ओरडण्याचा आवाज होईल, दुसर्‍या पेठेतून आक्रंदन होईल व टेकड्यांवरून मोठा धडाका उडेल,” असे परमेश्वर म्हणतो.


जे लोक मेले नाहीत त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या आणि त्या नगराचा आक्रोश गगनापर्यंत जाऊन पोहचला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan