Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 46:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचा आहे, आपल्या शत्रूंवर सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार खाऊन तृप्त होईल, ती त्यांचे रक्त पोटभर पिईल; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने उत्तरेच्या देशात फरात नदीच्या तीरी यज्ञ मांडला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर याने आपल्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून तो दिवस त्यास सूड घेण्याचा दिवस होईल. तेव्हा तलवार खाऊन तृप्त होईल. ती त्यांचे भरपूर रक्त पिईल. कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वरास फरात नदीच्या काठी उत्तरेच्या देशात यज्ञ करायचा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 कारण हा दिवस प्रभू, सर्वसमर्थ याहवेहचा आहे— हा सूड उगविण्याचा, त्यांच्या शत्रूंवर सूड उगविण्याचा दिवस आहे. रक्त पिऊन तिची तृप्ती होईपर्यंत तलवार तृप्त होईपर्यंत गिळंकृत करीत राहील. कारण प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, उत्तरेकडील फरात नदीकाठील प्रदेशात यज्ञार्पण करणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 46:10
25 Iomraidhean Croise  

मिसर देशाचा राजा कधी आपला देश सोडून बाहेर पडला नाही, कारण मिसर देशाच्या नाल्यापासून महानद फरात येथवर जो सर्व मुलूख मिसरी राजाचा होता तो बाबेलच्या राजाने काबीज केला होता.


सर्वसमर्थाने न्यायसमय का नेमून ठेवले नाहीत? त्याला ओळखणार्‍यांना त्याच्या दिवसांची का प्रतीती येत नाही?


आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे.


गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे; त्या दिवशी ते नीच होतील.


“अश्शूर तलवारीने पडेल पण मनुष्याच्या नव्हे; मनुष्याची नव्हे अशी तलवार त्याला ग्राशील; तो तलवारीपुढून पळेल; त्याच्या तरुण पुरुषांना वेठीस धरतील.


परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे;


कारण सूड घेण्याचा दिवस मी आपल्या मनात योजला होता, माझ्या उद्धारकार्याचे वर्ष आले आहे.


रानातल्या सर्व उजाड टेकड्यांवर लुटारू आले आहेत; कारण परमेश्वराची तलवार ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत देश ग्रासून टाकीत आहे; कोणत्याही मानवी प्राण्यास चैन नाही.


“हे मिसर देशात विदित करा, मिग्दोलात जाहीर करा; नोफ व तहपन्हेस ह्यांत जाहीर करा; म्हणा, ‘उभा राहा, सज्ज हो, कारण तुझ्याभोवतालचे सर्वकाही तलवारीने खाऊन टाकले आहे.’


मिसराविषयी : मिसर देशाचा राजा फारो नखो ह्याचे सैन्य कर्कमीशाजवळ फरात नदीच्या काठी होते, यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने त्या सैन्याचा निःपात केला त्याविषयी :


चपळ माणसाला पळून जाता येणार नाही, वीराला निसटून जाता येणार नाही; उत्तर दिशेस फरात नदीच्या तीरी ते ठोकर खाऊन पडत आहेत.


त्याच्यावर चोहोकडून रणघोष करा, त्याने हार खाल्ली आहे; त्याची तटबंदी पडली आहे, त्याचे कोट पाडले आहेत. कारण हा परमेश्वराकडून सूड आहे : त्याच्यावर सूड उगवून घ्या, त्याने केले तसे त्याला करा.


ह्याकरता सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी अश्शूराच्या राजाचा समाचार घेतला तसा बाबेलच्या राजाचा व त्याच्या देशाचा समाचार घेईन.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


हे मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, अम्मोनपुत्रांविषयी व त्यांनी केलेल्या निंदेविषयी प्रभू परमेश्वर जे म्हणतो ते सांग; तलवार, वधासाठी तलवार उपसली आहे, फन्ना उडवण्यासाठी, चमकण्यासाठी ती पाजवली आहे.


त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.


सीयोनात कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा; देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण, परमेश्वराचा दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे.


काळे घोडे असलेला रथ उत्तर देशाकडे जात आहे; पांढरे घोडे त्यांच्या मागून (पश्‍चिम देशाकडे) जात आहेत; कबरे घोडे दक्षिण देशाकडे जात आहेत.”


कारण शास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे ‘सूड घेण्याचे दिवस’ आहेत.


वधलेल्यांचे, पाडाव केलेल्यांचे आणि शत्रूंच्या केसाळ मस्तकांचे रक्त पाजून मी माझ्या बाणांना मस्त करीन; माझी तलवार मांस भक्षील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan