Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 45:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तू आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांच्छा करतोस काय? ती करू नकोस, पाहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो; पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जिवानिशी सुटशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण तू आपणासाठी मोठ्या गोष्टींची आशा करतोस काय? त्याची आशा करू नकोस. कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, सर्व मानवावर अरिष्ट येईल, पण जेथे कोठे तू जाशील तेथे तुला तुझे जीवन लूट असे मी देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मग तू स्वतःसाठी मोठमोठ्या गोष्टी मिळवू पाहतोस काय? तसे करू नकोस, कारण या सर्व लोकांवर मी महान विपत्ती आणणार असलो, तरी मात्र तू जिथे जाशील, तिथे मी तुझा जीव वाचवेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 45:5
19 Iomraidhean Croise  

देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती.


देव त्याला म्हणाला, “तू असला वर मागितलास; दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश ह्यांपैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितलीस,


ह्यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे म्हणजे मला बर्‍यावाइटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे?”


तो त्याला म्हणाला, “तो पुरुष तुला भेटण्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? चांदी, वस्त्रे, जैतुनांचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याचा हा समय आहे काय?


हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टींत मी पडत नाही.


कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्यजातीचा आपल्या तलवारीने न्याय करील; परमेश्वराने वधलेल्यांची संख्या मोठी असेल.


ह्या नगरात जो राहील तो तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल; जो बाहेर जाऊन तुम्हांला वेढा घालणार्‍या खास्द्यांना मिळेल तो जगेल, जिवानिशी सुटेल.


परमेश्वर, इस्राएलाचा देव, मला म्हणाला की, “माझ्या हातून संतापरूप द्राक्षारसाचा हा पेला घे व ज्या सर्व राष्ट्रांकडे मी तुला पाठवतो त्यांना तो पाज;


म्हणजे ते तो पितील, आणि त्यांच्यामध्ये मी तलवार पाठवीन. तिच्यामुळे ते तेथे झोकांड्या खातील व वेडे बनतील.”


परस्परांपासून दूर व जवळ असलेले उत्तरेकडचे सर्व राजे व ह्या भूतलावर असलेली पृथ्वीवरची सर्व राज्ये, ह्यांना तो पेला पाजला. ह्यांच्यामागून शेशखचा1 राजाही तो पिईल.


पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पोहचला आहे; कारण मी परमेश्वर राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे, मी सर्व मानवजातीबरोबर वाद घालीत आहे, व दुष्टांना तलवारीच्या स्वाधीन करीत आहे, असे परमेश्वर म्हणतो.’


“परमेश्वर म्हणतो, जो ह्या नगरात राहील तो तलवारीने, दुष्काळाने व मरीने मरेल; पण जो खास्द्यांकडे जाईल तो जगेल, तो जिवानिशी सुटेल.


मी खातरीने तुझा बचाव करीन; तू तलवारीने पडणार नाहीस, तू जिवानिशी सुटशील; कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे परमेश्वर म्हणतो.”


परमेश्वर म्हणतो, “मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा. कारण राष्ट्रे एकत्र जमवावीत, राज्ये एकत्र मिळवावीत; त्यांच्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.


परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका.


तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan