Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 45:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बारूख बिन नेरीया ह्याने यिर्मयाच्या तोंडची ही वचने पुस्तकात लिहिली तेव्हा त्याला यिर्मया संदेष्टा हे वचन बोलला :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नेरीयाचा मुलगा बारूख याला यिर्मया संदेष्ट्याने ही वचने सांगितली आहेत. हे त्यावेळी घडले जेव्हा यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात नेरीयाचा मुलगा बारुख याने ही वचने यिर्मयाच्या तोंडून ऐकून पुस्तकात लिहिली. तेव्हा यिर्मया संदेष्टा त्याच्याशी जे वचन बोलला. ते म्हणाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 45:1
18 Iomraidhean Croise  

यहोयाकीमाच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेसर ह्याने स्वारी केली; यहोयाकीम तीन वर्षे त्याचा अंकित होऊन राहिला; मग त्याने त्याच्यावर उलटून बंड केले.


यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता व त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले.


यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यहूदाच्या सर्व लोकांविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे :


यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या आरंभी परमेश्वरापासून हे वचन प्राप्त झाले.


आणि माझा चुलतभाऊ हानामेल ह्याच्यासमक्ष व ज्यांनी खरेदीखतावर साक्षी घातल्या होत्या त्यांच्यासमक्ष पहारेकर्‍यांच्या चौकात जे यहूदी बसले होते त्या सर्वांसमक्ष ते खरेदीखत बारूख बिन नरीया बिन महसेया ह्याच्या स्वाधीन केले.


मी ते खरेदीखत नरीयाचा पुत्र बारूख ह्याला दिल्यावर परमेश्वराची प्रार्थना केली की,


यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते असे :


“तू ग्रंथ लिहिण्याचा पट घे; आणि योशीयाच्या दिवसांत मी तुझ्याबरोबर बोललो तेव्हापासून आजवर इस्राएल, यहूदा व सर्व राष्ट्रे ह्यांच्याविरुद्ध जी वचने मी तुला सांगितली ती त्यावर लिहून काढ.


तेव्हा राजाने राजपुत्र यमेल, अरहज्रीएलपुत्र सराया, व अब्देलपुत्र शलेम्या ह्यांना अशी आज्ञा केली की बारूख लेखक व यिर्मया संदेष्टा ह्यांना धरून आणावे; पण परमेश्वराने त्यांना लपवले.


मग यिर्मयाने दुसरा पट घेऊन नेरीयाचा पुत्र बारूख लेखक ह्याला दिला; तेव्हा यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने जो ग्रंथ अग्नीत जाळून टाकला होता त्यातली सर्व वचने त्याने त्यावर यिर्मयाच्या सांगण्यावरून लिहिली, व त्यांत तशाच दुसर्‍या बहुत वचनांची भर घातली.


तेव्हा यिर्मयाने नेरीयाचा पुत्र बारूख ह्याला बोलावले, व परमेश्वराने यिर्मयाला जी वचने सांगितली होती ती सर्व त्याच्या तोंडून ऐकून बारुखाने त्या पटावर लिहिली.


“हे बारुखा, परमेश्वर, इस्राएलाचा देव तुला असे म्हणतो :


मिसराविषयी : मिसर देशाचा राजा फारो नखो ह्याचे सैन्य कर्कमीशाजवळ फरात नदीच्या काठी होते, यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने त्या सैन्याचा निःपात केला त्याविषयी :


यहूदाचा राजा सिद्कीया आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलास गेला, त्याच्याबरोबर सराया बिन नेरीया बिन मासेया गेला होता. त्याला यिर्मया संदेष्ट्याने जे आज्ञावचन सांगितले ते हे. सराया बिनीवाला सरदार होता.


यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यरुशलेमेवर चढाई करून त्याला वेढा घातला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan