Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 यहूदा देशात व यरुशलेमेच्या आळ्याआळ्यांतून केलेली तुमच्या पूर्वजांची दुष्कृत्ये, यहूदाचे राजे व त्यांच्या स्त्रिया ह्यांची दुष्कृत्ये, तुमची स्वतःची व तुमच्या स्त्रियांची दुष्कृत्ये, ह्यांचा तुम्हांला विसर पडला काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये आणि यहूदा राजा व त्याच्या बायकांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदाच्या देशात व यरूशलेमेच्या रस्त्यावर केलेली वाइट कृत्ये विसरलात का?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तुम्ही तुमच्या पूर्वजांनी केलेली पापे, यहूदीयाचे राजे व राण्यांनी केलेली पापे, यहूदीया नगरात व यरुशलेमच्या रस्त्यावर तुम्ही व तुमच्या स्त्रियांनी केलेली पापे, ही सर्व विसरला काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:9
9 Iomraidhean Croise  

“तुम्ही व तुमचे पूर्वज, तुमचे राजे व तुमचे सरदार आणि देशातील लोक ह्या सर्वांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत धूप जाळला त्याचे परमेश्वराला स्मरण नाही का झाले? त्याच्या लक्षात ते नाही का आले?


आणि मग येऊन ज्या मंदिराला मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करण्यास आम्हांला हरकत नाही, असे मनात म्हणता.


हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता


रानात तू आपला देव परमेश्वर ह्याला संतापवलेस त्याची आठवण ठेव, विसरू नकोस; मिसर देशातून तुम्ही बाहेर निघालात तेव्हापासून ह्या ठिकाणी येऊन पोहचेपर्यंत तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan