Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कारण तुम्ही ज्या मिसर देशात काही दिवस राहण्यास गेला आहात त्यात अन्य देवांना धूप जाळल्यामुळे तुम्ही आपला उच्छेद करून घ्याल व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांत शापास व अप्रतिष्ठेस पात्र व्हाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण तुम्ही जेथे राहण्यास गेला आहात त्या मिसर देशात दुसऱ्या देवाला धूप जाळून तुमच्या हातच्या कृत्यांनी मूर्तीपूजा करुन तुम्ही मला दुःखवता. तुम्ही तेथे जात आहात याकरिता की तुमचा नाश व्हावा आणि शापीत व्हावे व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमध्ये तुमची निंदा व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 इथे तुम्ही बनविलेल्या मूर्ती केल्या. इजिप्तमध्ये, जिथे तुम्ही निवास करण्यास आला आहात, तेथील इतर दैवतांना धूप जाळून, तुम्ही माझा क्रोध का भडकावित आहात व तुमचा पूर्ण नाश करावयाला मला का लावत आहात? तुम्ही स्वतःस पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शाप व त्यांच्या उपहासाचा विषय बनवित आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:8
29 Iomraidhean Croise  

तर जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यातून त्यांचे निर्मूलन करीन आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाप्रीत्यर्थ पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन आणि ते इतर सर्व राष्ट्रांत दृष्टान्ताचा व निंदेचा विषय करीन;


मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.


यरुशलेम कोसळली आहे, यहूदा पतन पावला आहे; कारण त्यांची जिव्हा व त्यांची कृत्ये परमेश्वराविरुद्ध असून ते त्याच्या तेजोमय नेत्रांना तुच्छ लेखतात.


तुम्ही आपले नाव मागे ठेवाल त्याचा उपयोग माझे निवडलेले लोक शाप देण्याकडे करून म्हणतील की प्रभू परमेश्वर तुला जिवे मारील; तो आपल्या सेवकांना दुसरे नाव ठेवील;


यहूदाची नगरे व यरुशलेमकर ज्या दैवतांना धूप जाळतात त्यांच्याकडे जाऊन ते आरोळी मारतील; पण संकटसमयी ती त्यांचे रक्षण मुळीच करणार नाहीत.


इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांनी बआलमूर्तीस धूप जाळून मला चिडवण्याचे दुष्कर्म केले आहे; म्हणून ज्या सेनाधीश परमेश्वराने तुला लावले त्याने तुला अरिष्टाची शिक्षा सांगितली आहे.”


अशा प्रकारे ते आपला देश दहशत व निरंतरचा उपहास ह्यांना पात्र करतात; त्याच्याजवळून येणारा-जाणारा प्रत्येक जण विस्मित होऊन आपले डोके हलवील.


पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप ह्यांचे विषय होतील.


तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन, आणि हे नगर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमूलक करीन.”’


मी तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी त्यांची पाठ पुरवीन; सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून दिले त्या सर्व राष्ट्रांत ते शाप, विस्मय, उपहास आणि निंदा ह्यांचे विषय होतील.


कारण इस्राएलाचे वंशज व यहूदाचे वंशज ह्यांनी तरुणपणापासून माझ्या दृष्टीने अगदी वाईट ते केले; इस्राएलाचे वंशज आपल्या हातच्या कर्मांनी केवळ मला संतापवत आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


“कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझा क्रोध व संताप ह्यांचा जसा यरुशलेमेत राहणार्‍यांवर वर्षाव झाला तसा तुम्ही मिसर देशात गेल्यावर तुमच्यावर होईल व तुम्ही निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय व्हाल; व हे ठिकाण तुमच्या दृष्टीस पुन्हा पडणार नाही.


मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा यहूदाच्या अवशिष्ट लोकांनी निश्‍चय केला त्या सर्वांवर माझा हात पडून त्यांचा नायनाट होईल; मिसर देशात ते पडतील; तलवारीने व दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल; लहानथोर तलवारीने व दुष्काळाने मृत्यू पावतील; ते निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय होतील.


त्यांनी जाऊन धूप जाळला व त्यांना, तुम्हांला व तुमच्या वडिलांनाही अज्ञात असलेल्या अशा अन्य देवांची सेवा त्यांनी केली; असा दुष्टपणा करून त्यांनी मला चिडवले म्हणून असे झाले.


ह्यास्तव आता सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो : तुम्ही आपल्या हातच्या कर्मांनी मला चिडवावे आणि यहूदातले तुमचे पुरुष, स्त्रिया, बालके व तान्ही ह्यांचा उच्छेद होऊन तुमच्यातला कोणी शिल्लक राहू नये, असे आपल्या जिवावर का अरिष्ट आणता?


हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?


वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया ह्यांची निखालस कत्तल करा; पण ज्यांच्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका; माझ्या पवित्रस्थानापासून आरंभ करा.” तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्यांनी आरंभ केला.


ते पर्वतांच्या माथ्यांवर यज्ञयाग करतात व टेकड्यांवर ओक, हिवर व एला ह्या झाडांची छाया चांगली असल्यामुळे त्यांच्याखाली धूप जाळतात; म्हणून तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात.


तो आपल्या जाळ्यांपुढे यज्ञ करतो, आपल्या पागाला विपुल धूप दाखवतो; कारण त्यांपासून त्याला विपुल धन व पुष्टिकारक अन्न मिळते.


बाहेर तलवार व घरात दहशत ह्या त्यांचे प्राण हरण करतील, मग तो कुमार असो की कुमारी असो, तान्हे बाळ असो की पिकल्या केसांचा म्हातारा असो.


कारण ऐकूनही कोणी ‘चीड आणली’? मोशेच्या द्वारे मिसरातून निघालेले सर्वच नव्हेत काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan