Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 पाहा, त्यांचे अभीष्ट नव्हे तर अनिष्ट व्हावे म्हणून मी त्यांच्यावर नजर ठेवीन; आणि मिसर देशात असलेल्या यहूदातल्या सर्व लोकांचा अंत होईपर्यंत ते दुष्काळाने व तलवारीने क्षय पावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 पाहा, मी त्यांच्या चांगल्यासाठी नाही तर त्यांच्या अनिष्टासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. यहूदा देशातला जो प्रत्येक व्यक्ती मिसर देशामध्ये आहे त्यांचा अंत होईपर्यंत ते तलवारीने नाश होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 इजिप्तमधील सर्व यहूदी लोक तलवारीने व दुष्काळाने नाश पावतील; तोपर्यंत त्यांच्या भल्यासाठी नव्हे तर अनिष्टासाठी माझी त्यांच्यावर नजर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:27
16 Iomraidhean Croise  

शेष राहिलेल्या माझ्या वतनरूप लोकांचा मी त्याग करीन; त्यांना शत्रूंच्या हाती देईन; ते आपल्या सर्व शत्रूंचे भक्ष्य व लूट होतील;


पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”


कारण मी ह्या नगराकडे तोंड केले आहे ते त्याच्या वाइटासाठी, त्याच्या बर्‍यासाठी नव्हे, असे परमेश्वर म्हणतो; ते बाबेलच्या राजाच्या हाती जाईल, तो त्याला आग लावून देईल.’


आणि असे होईल की उपटण्याच्या व मोडून टाकण्याच्या, पाडून टाकण्याच्या व नाश करण्याच्या आणि पीडा करण्याच्या कामी मी जशी त्यांच्यावर नजर ठेवली तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्यांच्यावर नजर ठेवीन, असे परमेश्वर म्हणतो.


“जा, एबद-मलेख कूशी ह्याला सांग की, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी आपल्या वचनाप्रमाणे ह्या नगराचे हित नव्हे तर अहित होईल असे करीन; त्या दिवशी तुझ्यादेखत ती वचने पूर्ण होतील.


ज्या तलवारीची तुम्हांला भीती वाटत आहे ती मिसर देशात तुम्हांला गाठील, व ज्या दुष्काळाची तुम्हांला भीती वाटते, तो मिसर देशात तुमच्या पाठोपाठ येईल; तेथे तुम्ही मराल.


मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा यहूदाच्या अवशिष्ट लोकांनी निश्‍चय केला त्या सर्वांवर माझा हात पडून त्यांचा नायनाट होईल; मिसर देशात ते पडतील; तलवारीने व दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल; लहानथोर तलवारीने व दुष्काळाने मृत्यू पावतील; ते निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय होतील.


मी यरुशलेमेस शिक्षा केली तशी मिसर देशात जाऊन राहिलेल्यांना तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी शिक्षा करीन.


यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशास परत जाण्याच्या आशेने मिसर देशात काही दिवस राहिले आहेत व स्वदेशी परत जाऊन राहण्याची फार अपेक्षा करीत आहेत त्यांतला कोणी निभावणार किंवा उरणार नाही. पळून जाणार्‍या लोकांखेरीज त्यांतला कोणीही परत जाणार नाही.”


पण आम्ही आकाशराणीला धूप जाळण्याचे व तिला पेयार्पणे करण्याचे बंद केले तेव्हापासून आम्हांला सर्व गोष्टींची वाण पडली, आणि तलवारीने व दुष्काळाने आमचा नायनाट होत चालला आहे.”


ह्यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांना कडू दवणा चारीन, त्यांना विषाचे पाणी पाजीन,


आणि जी राष्ट्रे त्यांना व त्यांच्या पूर्वजांना माहीत नव्हती त्यांच्यामध्ये त्यांची दाणादाण करीन; त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.”


तुझ्या वस्तीचा तिसरा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील; तिसरा हिस्सा तुझ्याभोवती तलवारीने पडेल; व तिसरा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन; मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन.


अंत आला आहे, आला आहे! तो तुझ्यासाठी जागृत झाला आहे; पाहा, तो येत आहे.


ह्यास्तव परमेश्वराने विपत्तीवर नजर ठेऊन ती आमच्यावर आणली आहे; कारण आमचा देव परमेश्वर जी काही कृत्ये करतो ती न्याय्य आहेत, पण आम्ही त्याची वाणी ऐकली नाही.


पाहा, प्रभू परमेश्वराचा डोळा ह्या पापिष्ट राज्यावर आहे; मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन; याकोबाचे घराणे मात्र मी समूळ नष्ट करणार नाही,” असे परमेश्वर म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan