Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तरीपण यहूदातले जे सर्व तुम्ही मिसर देशात राहत आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका : परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आपल्या थोर नामाची शपथ वाहिली आहे की अखिल मिसर देशात, ‘परमेश्वराच्या जीविताची शपथ,’ असे म्हणायला माझे नाम यहूदातल्या माणसांपैकी कोणाच्या मुखातून निघणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 यास्तव जे तुम्ही यहूदी देशातले मिसर देशात राहता ते सर्व तुम्ही परमेश्वराची वचने ऐका; पाहा, मी आपल्या थोर नावाची शपथ वाहिली आहे की, सर्व मिसर देशामध्ये राहणाऱ्या यहूदा देशातल्या कोणत्याही मनुष्याच्या मुखाने परमेश्वर जिवंत आहे असे म्हणून माझे नाव पुन्हा घेण्यात येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तरीपण इजिप्त देशात राहणार्‍या सर्व यहूद्यांनो, याहवेहचे वचन ऐका: ‘मी आपल्या थोर नामाची शपथ घेत आहे, याहवेह म्हणतात, इजिप्त देशात राहणारे कोणीही यहूदीयाचे नागरिक “सार्वभौम याहवेहच्या नावाची शपथ.” असे कधीही म्हणणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:26
28 Iomraidhean Croise  

“परमेश्वर म्हणतो, मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस;


दुर्जनाला तर देव म्हणतो : “माझे नियम विदित करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण?


मी आपला करार मोडणार नाही; माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही.


परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की, “ह्यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूंना मी खातरीने खाऊ देणार नाही; तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षारस परके प्राशन करणार नाहीत;


परमेश्वर म्हणतो, “माझी शपथ, तुम्ही ही वचने ऐकली नाहीत तर हे मंदिर ओस पडेल.


परमेश्वर खरोखर म्हणतो, खाण्याजोगे नाहीत असे जे वाईट अंजीर आहेत त्यांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार, आणि ह्या देशात राहिलेले व मिसर देशात वस्ती करून राहिलेले यरुशलेमेचे अवशिष्ट लोक ह्यांचे मी करीन.


आणि सत्याने, न्यायाने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणांस धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील.”


“ह्यामुळे सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुमचे अनिष्ट करण्यासाठी व सर्व यहूदाचा उच्छेद करण्यासाठी मी तुम्हांला विन्मुख होईन.


यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशास परत जाण्याच्या आशेने मिसर देशात काही दिवस राहिले आहेत व स्वदेशी परत जाऊन राहण्याची फार अपेक्षा करीत आहेत त्यांतला कोणी निभावणार किंवा उरणार नाही. पळून जाणार्‍या लोकांखेरीज त्यांतला कोणीही परत जाणार नाही.”


यिर्मया त्या सर्व लोकांना व सर्व स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही सगळे लोक मिसर देशात आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.


राजेश्वर, सेनाधीश परमेश्वर, हे ज्याचे नाम तो म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, डोंगरामध्ये जसा ताबोर व समुद्राजवळ जसा कर्मेल तसा तो निश्‍चये येईल.


परमेश्वर म्हणतो, मी आपल्या जीविताची शपथ वाहिली आहे की बसरा विस्मय, निंदा, उजाडी व शाप ह्यांना पात्र होईल; त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.”


“परमेश्वराच्या जीविताची शपथ,” असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे.


सेनाधीश परमेश्वर आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणाला आहे, मी तुझ्यात टोळांप्रमाणे माणसे भरीन; ते तुझ्याविरुद्ध गर्जना करतील.


हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता


ह्यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएल घराण्या, जा, आपल्या हव्या त्या मूर्तीची पूजा कर; पण पुढे तुम्ही खरोखर माझे ऐकाल, आणि आपल्या अर्पणांनी व मूर्तींनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावणार नाही.


हे इस्राएला, तू जरी जारकर्म केले आहेस तरी यहूदाने अशा पापात पडू नये; गिल्गालास येऊ नका, व बेथ-आवेनास जाऊ नका, परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहू नका.”


एखाद्याचा नातलग त्याला उचलण्यासाठी आणि त्याला जाळण्यासाठी त्याची हाडे घरातून बाहेर नेण्यास येईल, तेव्हा तो घरातल्या अंतर्भागी असणार्‍याला विचारील की, “आणखी कोण तुझ्याबरोबर आहे काय?” तो म्हणेल, “नाही”; तेव्हा हा म्हणेल, “गप्प राहा! परमेश्वराचा नामोच्चार करायचा नाही.”


प्रभू परमेश्वराने स्वतःची शपथ वाहिली; परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “मी याकोबाच्या वैभवाचा तिरस्कार करतो, त्याच्या महालांचा मी तिटकारा करतो, हे नगर व त्यातील सर्व मी इतरांच्या हाती देईन.”


परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहिली आहे की, “मी त्यांची कोणतीही कर्मे खातरीने कधीही विसरणार नाही.


म्हणून तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो : ‘माझी शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे त्याप्रमाणेच मी तुमचे खरोखर करीन;


आणि ‘शपथ वाहून’ तो कोणाला म्हणाला की, ‘तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही?


देवाने अब्राहामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटले की,


ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan