यिर्मया 44:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा यहूदाच्या अवशिष्ट लोकांनी निश्चय केला त्या सर्वांवर माझा हात पडून त्यांचा नायनाट होईल; मिसर देशात ते पडतील; तलवारीने व दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल; लहानथोर तलवारीने व दुष्काळाने मृत्यू पावतील; ते निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण मिसर देशात जाऊन तेथे राहण्याचा यहूदाच्या अवशिष्टांनी निश्चय केला. मी हे यासाठी करीन की, ते सर्व मिसर देशात नष्ट होतील. तलवारीने आणि दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल. लहानापासून थोरापर्यंत सर्व तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील. ते मरतील आणि अपशब्द, शाप, निंदा आणि भयानक गोष्टींचे विषय होतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 इजिप्तमध्ये जाण्याचा हट्ट धरणार्या या यहूदीयातील उरलेल्या लोकांना मी नाहीसे करेन. ते सर्वजण इजिप्तमध्ये नष्ट होतील; ते तलवारीने वा दुष्काळाने मरण पावतील. अगदी लहानांपासून थोरापर्यंत सर्व तलवारीने वा दुष्काळाने मरतील. ते एक असा शाप होतील, ते भयानकतेचा, तिरस्काराचा, व शापाचा विषय होतील. Faic an caibideil |