Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ते अजून नम्र झाले नाहीत, त्यांना भीती वाटत नाही, व तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना मी लावून दिलेले आपले नियमशास्त्र व आपले विधी ह्याप्रमाणे ते चालत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ते या दिवसापर्यंत, अजून नम्र झालेले नाहीत. ते माझे जे नियमशास्त्र व माझे जे विधी मी तुम्हापुढे आणि तुमच्या पूर्वजांपुढे ठेवले, त्यांचा त्यांनी आदर केला नाही किंवा ते त्याप्रमाणे चालले नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि अद्यापही कोणी लीन होऊन माझ्याविषयी श्रद्धा व्यक्त केली नाही, किंवा मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेले नियम व आज्ञा पाळल्या नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:10
38 Iomraidhean Croise  

“अहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना? तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन.”


तू ही वचने ऐकून दीन झालास, आणि हे स्थान व ह्यातील रहिवासीही विस्मयाला व शापाला विषय होतील असे जे मी बोललो आहे ते ऐकून परमेश्वरापुढे नम्र झालास, तू आपली वस्त्रे फाडलीस व माझ्यासमोर रडलास ह्यामुळे मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


तथापि हिज्कीया आणि यरुशलेमकर आपल्या हृदयाच्या उन्मत्ततेविषयी अनुताप पावून नम्र झाले, म्हणून परमेश्वराचा क्रोध हिज्कीयाच्या काळात त्यांच्यावर भडकला नाही.


तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला.


त्याने केलेली प्रार्थना ती कशी मान्य झाली ते, त्याचे सर्व पाप व अपराध, तो दीन होण्यापूर्वी त्याने उच्च स्थाने कोठेकोठे बांधली ते आणि अशेरा मूर्ती व कोरीव मूर्ती त्याने कशा उभारल्या ते सर्व द्रष्ट्यांच्या1 बखरीत लिहिले आहे.


तुझे हृदय मृदू झाले, तू देवापुढे नम्र झालास आणि ह्या स्थानाविरुद्ध व येथल्या रहिवाशांविरुद्ध मी सांगितले ते ऐकून तू दीन होऊन आपली वस्त्रे फाडून माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.


देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.


त्यांनी देवाचा करार पाळला नाही; त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्यास ते कबूल नव्हते;


मग मोशे आणि अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, “इब्री लोकांचा देव परमेश्वर असे म्हणतो, ‘तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे.


तू अद्यापि माझ्या लोकांशी चढेलपणाने वागून त्यांना जाऊ देत नाहीस काय?


तथापि हे मला ठाऊक आहे की अजूनही तुम्ही आणि तुमचे सेवक परमेश्वर देव ह्याला भीत नाहीत.”


सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो; मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो;


दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात.


जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीत पडतो.


परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते.


याकोबाला लुटीस कोणी जाऊ दिले? इस्राएलास लुटारूंच्या स्वाधीन कोणी केले? ज्या परमेश्वराविरुद्ध आम्ही पाप केले त्यानेच की नाही? त्याच्या मार्गांनी ते चालेनात, त्याचे नियमशास्त्र ते ऐकेनात;


कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.


परमेश्वर म्हणतो, “ह्या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत; म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत; पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो.


हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्यासमान कोणीच नाही.


त्यांना सांग की, ‘परमेश्वर असे म्हणतो : तुम्ही माझे ऐकणार नाही, मी तुमच्यापुढे ठेवलेल्या नियमांप्रमाणे तुम्ही चालणार नाही,


त्यांनी येऊन त्याचा ताबा घेतला, परंतु त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही व तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे ते चालले नाहीत; तू त्यांना आज्ञापिले त्याप्रमाणे त्यांनी मुळीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणलेस.


राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकली, तेव्हा ते कोणी घाबरले नाहीत, कोणी आपली वस्त्रे फाडली नाहीत.


तुम्ही धूप जाळला, परमेश्वराविरुद्ध पाप केले, परमेश्वराची वाणी ऐकली नाही, त्याचे नियमशास्त्र, त्याचे विधी व त्याचे निर्बंध ह्यांनी तुम्ही चालला नाहीत; म्हणून तुमच्यावर हे अरिष्ट आले आहे हे आज दिसतच आहे.”


हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.


त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो.


त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर त्याला म्हणाला, “नगरामधून, यरुशलेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.”


पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.


शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.


परंतु दुसर्‍याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय?


बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग;


म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हांला उंच करावे.


‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan