Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 जे यहूदी मिसर देशात, म्हणजे मिग्दोल, तहपन्हेस, नोफ व पथ्रोस प्रांत ह्यांत वस्ती करून होते त्यांच्याविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जे सर्व यहूदी मिसर देशामध्ये राहत होते, जे मिग्दोल, तहपन्हेस, मेमफिस व पथ्रोस येथे राहत होते, त्यांच्याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले ते असे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 इजिप्तच्या उत्तरेस मिग्दोल, तहपनहेस, व मेम्फीस या शहरात व संबंध दक्षिण इजिप्तमधील पथरोस प्रदेशात राहत असलेल्या यहूद्यांसंबंधी याहवेहचे यिर्मयाहला हे वचन आले:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:1
19 Iomraidhean Croise  

पात्रुसीम, कास्लूहीम (ह्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरी हे झाले.


“इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र ह्यांच्यामध्ये असलेल्या पी-हहिरोथापुढे बाल-सफोनासमोर तळ द्यावा; त्यासमोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावेत.


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत; नोफाचे सरदार फसले आहेत; मिसरी गोत्रांची कोनशिला असे जे, त्यांनी मिसराला बहकवले आहे.


नोफ व तहपन्हेस ह्यांच्या लोकांनी तुला खाऊन टाकले आहे.


परमेश्वर खरोखर म्हणतो, खाण्याजोगे नाहीत असे जे वाईट अंजीर आहेत त्यांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार, आणि ह्या देशात राहिलेले व मिसर देशात वस्ती करून राहिलेले यरुशलेमेचे अवशिष्ट लोक ह्यांचे मी करीन.


तो मिसर देशातले जे बेथ-शेमेश त्याचे स्तंभ मोडून टाकील व मिसर देशातील दैवतांची गृहे तो अग्नीने जाळील.”’


तेव्हा आपल्या स्त्रिया अन्य देवांना धूप जाळतात हे ज्या पुरुषांना ठाऊक होते त्यांनी आणि तेथे उभ्या असलेल्या सर्व स्त्रियांचा मोठा समुदाय व मिसर देशातील पथ्रोसात राहिलेले सर्व लोक ह्यांनी यिर्मयाला प्रत्युत्तर केले की :


“हे मिसर देशात विदित करा, मिग्दोलात जाहीर करा; नोफ व तहपन्हेस ह्यांत जाहीर करा; म्हणा, ‘उभा राहा, सज्ज हो, कारण तुझ्याभोवतालचे सर्वकाही तलवारीने खाऊन टाकले आहे.’


मिसरनिवासिनी कन्ये, बंदिवासात जाण्यासाठी सामग्री तयार कर; कारण नोफ उजाड होईल, जळून निर्जन होईल.


तर पाहा, मी तुझ्या नद्यांवर उठेन; मी मिग्दोलापासून सवेनेपर्यंत, कूशाच्या सीमेपर्यंत, मिसर देश ओसाड व उजाड करीन.


मी मिसर देशाचा बंदिवास उलटवीन, मी पथ्रोस देशात त्यांच्या जन्मभूमीस त्यांना परत आणीन; तेथे त्यांचे एक खालच्या दर्जाचे राज्य होईल.


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी नोफातील दैवतांचा उच्छेद करीन, मूर्ती नाहीतशा करीन आणि मिसर देशातला कोणीही ह्यापुढे अधिपती होणार नाही असे करीन; मिसर देश दहशतीने भरीन.


मी पथ्रोस उजाड करीन, सोअनास आग लावीन, नो ह्याला न्यायदंड करीन.


मी मिसरास आग लावीन; सीन वेणा देईल; नो छिन्नभिन्न होईल, नोफावर तर भरदिवसा वैरी उठतील.


मिसर्‍यांनी घातलेले जोखड मी मोडून टाकीन व त्यांच्या पराक्रमाचा गर्व जिरेल तेव्हा तहपन्हेस येथे दिवस अंधकारमय होईल, ते अभ्राने आच्छादले जाईल. त्याच्या कन्या बंदिवान होऊन जातील.


कारण पाहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत; मिसर त्यांना गोळा करील, मोफ त्यांना मूठमाती देईल; काटेकुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील, त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan