Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 43:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ते मिसर देशास गेले, कारण त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही; ते तहपन्हेस येथे जाऊन पोहचले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 ते मिसर देशात, तहपन्हेस येथे गेले, कारण त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांनी याहवेहची आज्ञा न पाळता इजिप्तमध्ये प्रवेश केला आणि ते तहपनहेस पर्यंत येऊन पोहोचले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 43:7
11 Iomraidhean Croise  

तेव्हा लहानथोर सर्व लोक आणि सेनांचे नायक मिसर देशाला निघून गेले; त्यांना खास्द्यांचा धाक पडला होता.


तो त्याला असे बोलू लागला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प राहा; तुला मार पाहिजे काय?” तेव्हा संदेष्टा गप्प राहिला. मग तो म्हणाला, “मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरवले आहे, कारण तू हे असे केले आहेस व माझा सल्ला घेतला नाहीस.”


ती फारोचा आश्रय करण्यासाठी व मिसराच्या छायेत लपण्यासाठी माझ्या तोंडचे वचन विचारून न घेता मिसराची वाट धरतात!


त्याचे (यहूदाचे) सरदार सोअनात दाखल झाले आहेत व त्याचे वकील हानेसाला पोहचले आहेत.


नोफ व तहपन्हेस ह्यांच्या लोकांनी तुला खाऊन टाकले आहे.


ते मिसर देशास जाण्याच्या हेतूने बेथलेहेमनजीक गेरूथ-किम्हाम येथे जाऊन राहिले;


ते आज मी तुम्हांला कळवले आहे; तरी परमेश्वर तुमचा देव ह्याने माझ्या द्वारे तुम्हांला जे सांगून पाठवले त्यांतल्या कशाविषयीही तुम्ही त्याची वाणी ऐकली नाही.


जे यहूदी मिसर देशात, म्हणजे मिग्दोल, तहपन्हेस, नोफ व पथ्रोस प्रांत ह्यांत वस्ती करून होते त्यांच्याविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे :


यिर्मया त्या सर्व लोकांना व सर्व स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही सगळे लोक मिसर देशात आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.


“हे मिसर देशात विदित करा, मिग्दोलात जाहीर करा; नोफ व तहपन्हेस ह्यांत जाहीर करा; म्हणा, ‘उभा राहा, सज्ज हो, कारण तुझ्याभोवतालचे सर्वकाही तलवारीने खाऊन टाकले आहे.’


मिसर्‍यांनी घातलेले जोखड मी मोडून टाकीन व त्यांच्या पराक्रमाचा गर्व जिरेल तेव्हा तहपन्हेस येथे दिवस अंधकारमय होईल, ते अभ्राने आच्छादले जाईल. त्याच्या कन्या बंदिवान होऊन जातील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan