Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 43:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 पुरुष, स्त्रिया, मुले, राजकन्या ह्यांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या हवाली केलेल्या सर्व लोकांना आणि यिर्मया संदेष्टा आणि बारूख बिन नेरीया ह्यांना त्यांनी नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्यांनी पुरुष व स्त्रिया, मुले व राजांच्या मुली आणि राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने जे सर्वजण शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याच्याजवळ ठेवले होते त्यांना आणि यिर्मया संदेष्टा व नेरीयाचा मुलगा बारूख ह्यांनाही बरोबर नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्या जमावात पुरुष, स्त्रिया, मुले, राजाच्या कन्या व तसेच पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने अहीकामचा पुत्र, शाफानचा नातू गदल्याहच्या स्वाधीन केलेले सर्व लोक होते. त्यांनी यिर्मयाह संदेष्टा व नेरीयाहचा पुत्र बारूख ह्यांनाही आपल्याबरोबर घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 43:6
11 Iomraidhean Croise  

पाहा, यहूदाच्या राजाच्या घरी ज्या स्त्रिया उरल्या आहेत त्या सर्वांना बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे आणतील आणि त्या म्हणतील, ‘तुझ्या जिवलग मित्रांनी तुला दगा दिला, त्यांनी तुला चीत केले व तुझे पाय चिखलात रुतले असता ते निघून गेले आहेत.’


तथापि जे लोक लाचार असून ज्यांच्याजवळ काहीएक नव्हते अशांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यहूदा देशात राहू दिले; त्याच वेळेस त्याने त्यांना द्राक्षांचे मळे व शेते दिली.


त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशांत जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,


बाबेलच्या राजाने गदल्या बिन अहीकाम ह्याला देशाचा अधिपती नेमून पुरुष, स्त्रिया, मुले, देशातील सर्व लाचार व ज्या कोणाला पकडून बाबेलास नेले नव्हते ते सर्व त्याच्या स्वाधीन केले आहेत असे जेव्हा रानावनात असलेल्या सेनानायकांनी व त्यांच्या लोकांनी ऐकले,


तेव्हा इश्माएलाने मिस्पा येथे असलेले सर्व अवशिष्ट लोक पकडून नेले; राजकन्यांना व मिस्पा येथे राहिलेल्या सर्व लोकांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम ह्याच्या स्वाधीन केले होते त्यांना नेले; इश्माएल बिन नथन्या ह्याने त्यांना बंदिवान करून नेले व तो अम्मोनी लोकांकडे जाण्यास निघाला.


तर तू आम्हांला खास्द्यांच्या हाती द्यावे आणि त्यांनी आम्हांला जिवे मारावे, आम्हांला बंदिवान करून बाबेलास न्यावे म्हणून बारूख बिन नेरीया तुला आमच्याविरुद्ध मथवत आहे.”


यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बारूख बिन नेरीया ह्याने यिर्मयाच्या तोंडची ही वचने पुस्तकात लिहिली तेव्हा त्याला यिर्मया संदेष्टा हे वचन बोलला :


बाबेलच्या राजाने सिद्कीयाचे पुत्र त्याच्या डोळ्यां-देखत वधले; तसेच त्याने यहूदाचे सर्व सरदार रिब्ला येथे मारून टाकले.


मी त्याच्या क्रोधरूप दंडाचे दु:ख भोगलेला मनुष्य आहे.


मी तुला खचीत खचीत सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वत: कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास; परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan