यिर्मया 43:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तर ज्या सर्व राष्ट्रांत त्यांना घालवले होते त्यांतून यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्या सर्वांना योहानान बिन कारेह व सर्व सेनानायक ह्यांनी आपल्याबरोबर नेले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण कारेहाचा मुलगा योहानान व सैन्यांचे सर्व अधिकारी यांनी वाचलेले सर्व यहूदी जे ज्या सर्व राष्ट्रांत पसरले होते. त्यातून यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्यांना आपल्याबरोबर घेतले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यहूदीया जे इतर देशात विखुरलेले पण आता परत आलेल्या सर्व उरलेल्या लोकांना कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख आपल्या देखरेखीत घेऊन निघाले. Faic an caibideil |
आता माझे स्वामीराज ह्यांनी आपल्या दासाची विनंती ऐकावी; परमेश्वराने जर आपणाला माझ्याविरुद्ध चेतवले असेल तर तो हे माझे अर्पण मान्य करो; पण कोणी मानवांनी आपणाला चेतवले असेल तर परमेश्वराच्या दृष्टीने ते शापित होवोत, कारण मी परमेश्वराच्या वतनाचा वाटेकरी होऊ नये म्हणून त्यांनी मला बाहेर हाकून दिले आहे; ते म्हणतात, जा, अन्य देवतांची उपासना कर.