Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 43:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तो मिसर देशातले जे बेथ-शेमेश त्याचे स्तंभ मोडून टाकील व मिसर देशातील दैवतांची गृहे तो अग्नीने जाळील.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तो मिसर देशामधील बेथ-शेमेश त्याचे स्तंभ मोडून टाकील. तो मिसरी देवतांची मंदिरे जाळून टाकील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तसेच इजिप्तमधील सूर्यदेवतेच्या मंदिरातील बेथ-शेमेशचे स्तंभ नष्ट करून तो मोडून टाकील व इजिप्तच्या दैवतांची मंदिरे जाळून भस्म करेल.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 43:13
13 Iomraidhean Croise  

फारोने योसेफाचे नाव सापनाथ-पानेह असे ठेवले; आणि ओन येथील याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ ही त्याला बायको करून दिली. मग योसेफ मिसर देशात दौरा करू लागला.


मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.


त्या दिवशी मिसर देशाची पाच नगरे कनान देशाची भाषा बोलतील; ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील; त्यांपैकी एकाला ईर-हरेस (विनाशनगर) म्हणतील.


ती एकदम वाकली, खचली आहेत; त्यांना हे ओझे सावरता आले नाही. ती स्वत:च पकडून नेण्यात आली आहेत.


तुम्ही त्यांना हे सांगा की, “ज्या देवांनी आकाश व पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरून, आकाशाखालून नष्ट होतील.”


मिसर देशाचा राजा फारो, त्याचे सेवक, त्याचे सरदार व त्याचे सर्व लोक ह्यांना,


शिवाय मी मिसरी दैवतांच्या गृहात अग्नी पेटवीन; तो राजा त्यांना जाळील व बंदिवान करून नेईल; मेंढपाळ आपले अंग जसे वस्त्राने वेष्टतो तसा तो मिसर देशाने स्वतःस वेष्टील व शांतीने तेथून निघून जाईल.


जे यहूदी मिसर देशात, म्हणजे मिग्दोल, तहपन्हेस, नोफ व पथ्रोस प्रांत ह्यांत वस्ती करून होते त्यांच्याविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे :


सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो : “पाहा नो येथला आमोन, फारो, मिसर व त्यांची दैवते आणि राजे, फारो व त्याच्यावर भिस्त ठेवणारे ह्यांचा मी समाचार घेईन.


तो आपल्या घोड्यांच्या टापांनी तुझे सर्व रस्ते तुडवील; तो तुझे लोक तलवारीने ठार मारील, तुझे मजबूत स्तंभ जमीनदोस्त होतील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी नोफातील दैवतांचा उच्छेद करीन, मूर्ती नाहीतशा करीन आणि मिसर देशातला कोणीही ह्यापुढे अधिपती होणार नाही असे करीन; मिसर देश दहशतीने भरीन.


आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील; ही नगरे जिंकली जातील.


तो त्यांची दैवते, ओतीव मूर्ती, आणि त्यांची सोन्यारुप्याची सुंदर भांडी लुटून मिसर देशात नेईल; तो उत्तरेच्या राजावर चढाई न करता काही वर्षे राहील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan