Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 43:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आणि त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, माझा सेवक नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणीन व हे जे धोंडे मी लपवून ठेवले आहेत त्यांवर त्याचे सिंहासन ठेवीन; मग तो त्यांवर आपला भव्य गालिचा पसरील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मग त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, पाहा, मी बाबेलाचा राजा, नबुखद्नेस्सर, माझा सेवक याला येथे निरोप्या पाठवून बोलावून घेईन. यिर्मया तू या पुरलेल्या धोंड्यावर मी त्याचे सिंहासन स्थापीन, नबुखद्नेस्सर त्यावर आपला भव्य गालीचा पसरवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि मग त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला इजिप्तमध्ये पाठवेन. मी त्याचे सिंहासन याच लपविलेल्या धोंड्यावर स्थापन करेन; मग तो त्यावर आपला राजमंडप पसरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 43:10
19 Iomraidhean Croise  

हा निरोप बेन-हदादास मिळाला त्या वेळी तो व इतर राजे डेर्‍यांमध्ये पीत बसले होते; तो आपल्या सैनिकांना म्हणाला, “व्यूह रचा.” तेव्हा त्यांनी नगरापुढे व्यूह रचला.


ते भर दोन प्रहरी चाल करून गेले. त्या प्रसंगी बेन-हदाद व त्याच्या कुमकेस आलेले बत्तीस राजे डेर्‍यांमध्ये पिऊन मस्त होत होते.


त्याने आपणाला काळोखाने आच्छादून घेतले, त्याने आपणाला आकाशातील मेघमय अंधाराचा, दाट ढगांचा मंडप केला.


कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्‍याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील.


तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवतोस; शब्दकलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस.


मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’


परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्‍त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे; राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो.


कारण पाहा, मी उत्तरेकडल्या राष्ट्रांतील सर्व जाती बोलावत आहे, असे परमेश्वर म्हणतो; ते येऊन यरुशलेमेच्या वेशींपुढे, तिच्या सभोवार असलेल्या सर्व तटांपुढे व यहूदाच्या सर्व नगरांपुढे आपापली सिंहासने स्थापतील.


“आपल्या हाती मोठे धोंडे घे व यहूदाच्या लोकांसमक्ष तहपन्हेस येथल्या फारोच्या राजगृहाच्या द्वाराशी जो चौक आहे त्यात ते चुना लेपून लपवून टाक;


बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर येऊन मिसर देशावर मारा करील, त्याविषयी यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


मी एलामात आपले सिंहासन मांडीन आणि तेथून राजा व सरदार ह्यांचा नाश करीन, असे परमेश्वर म्हणतो.


तुझ्या वस्तीचा तिसरा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील; तिसरा हिस्सा तुझ्याभोवती तलवारीने पडेल; व तिसरा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन; मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन.


तोच प्रसंग व समय बदलतो; तो राजांना स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यांस ज्ञान देतो व बुद्धिमानांस बुद्धी देतो.


तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan