Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 42:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले, “आमची एवढी विनंती मान्य करा; आपणाला दिसत आहे की, आम्ही बहुतांपैकी थोडेच राहिलो आहोत; तर आम्हा सर्व अवशिष्ट लोकांसाठी परमेश्वर आपला देव ह्याच्याकडे प्रार्थना करा की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 ते त्यास म्हणाले, “आमची विनंती तुझ्यासमोर येवो. जे आम्ही संख्येने थोडे लोक उरले आहोत, ते तू पाहत आहेस, त्या आम्हासाठी तुझा देव परमेश्वराकडे प्रार्थना कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यिर्मयाह संदेष्ट्याकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही सर्व उरलेल्या लोकांसाठी याहवेह, तुझे परमेश्वर यांची प्रार्थना कर. कारण आम्ही पूर्वी पुष्कळ होतो, आता फारच थोडे उरलो आहोत, हे तू पाहतोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 42:2
34 Iomraidhean Croise  

राजाने त्या देवाच्या माणसाला विनंती केली की, “माझा हात पुन्हा पूर्ववत व्हावा म्हणून आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे माझ्यासाठी विनंती करून प्रार्थना कर.” देवाच्या माणसाने परमेश्वराला विनवणी केली तेव्हा राजाचा हात बरा होऊन पूर्वीसारखा झाला.


माझी विनंती तुझ्यापुढे येवो; तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर.


फारो म्हणाला, “तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव ह्याला यज्ञ करावा ह्यासाठी मी तुम्हांला जाऊ देतो; मात्र फार दूर जाऊ नका; माझ्यासाठी विनवणी करा.”


तुम्ही परमेश्वराची विनवणी करा; ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे तेवढी पुरे, मी तुम्हांला जाऊ देतो; तुम्हांला इतःपर राहायला नको.”


तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.


सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.


तुझा देव परमेश्वर कदाचित रब-शाके ह्याचे शब्द ऐकेल; त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा ह्याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठवले आहे; आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील; म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्यासाठी तू रदबदली कर.”’


तू बहुत पाहिले आहे ते ध्यानात ठेवत नाहीस; त्याचे कान उघडे आहेत पण तो ऐकत नाही.


परमेश्वर म्हणतो, तुझ्या बर्‍यासाठी मी तुला खचीत बळ देईन; अनिष्टाच्या व क्लेशाच्या समयी शत्रू तुझी विनवणी करतील असे मी खचीत करीन.


ते काष्ठास म्हणतात, ‘तू माझा बाप;’ पाषाणास म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास;’ त्यांनी माझ्याकडे मुख नव्हे तर पाठ फिरवली; तरी संकटसमयी ते म्हणतील, ‘ऊठ; आमचा बचाव कर.’


“आमच्याकरता परमेश्वराला प्रश्‍न कर; बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर आमच्याबरोबर लढाई करीत आहे. तो आमच्यापासून निघून जावा म्हणून परमेश्वर कदाचित आपल्या सर्व अद्भुत कृतींना अनुसरून आमच्याशी वर्तेल काय? असे विचार;”


कदाचित ते परमेश्वरापुढे आपली विनंती सादर करतील व आपापल्या कुमार्गापासून वळतील; कारण परमेश्वराने ह्या लोकांवर क्रोध व संताप करीन म्हणून सांगितले तो भारी आहे.”


आता, अहो माझे स्वामीराज, माझे ऐका; माझी विनंती आपणांला मान्य होवो; मला त्या योनाथान लेखकाच्या घरात परत पाठवू नका, पाठवाल तर मी तेथे मरेन.”


तेव्हा सिद्कीया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मया संदेष्ट्याकडे सांगून पाठवले की, “आमच्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे प्रार्थना कर.”


नंतर सिद्कीया राजाने यिर्मया संदेष्ट्याला बोलावणे पाठवून परमेश्वराच्या मंदिराच्या तिसर्‍या द्वाराच्या देवडीत आणवले. राजा यिर्मयाला म्हणाला, “मी तुला एक गोष्ट विचारतो; माझ्यापासून काही लपवू नकोस.”


तेव्हा योहानान बिन कारेह गदल्यास मिस्पा येथे गुप्तपणे म्हणाला, “मला जाऊन इश्माएल बिन नथन्या ह्याला ठार करू द्या; हे कोणाला कळणार नाही; त्याने आपला प्राण का घ्यावा? घेतल्यास आपणांकडे जमलेले सर्व यहूदी पांगतील व यहूदाच्या अवशेषाचा नाश होईल.”


ह्या प्रकारे तुम्ही आपला जीव धोक्यात घातला आहे; कारण परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे मला पाठवून तुम्ही म्हटले की, ‘परमेश्वर आमचा देव ह्याची आमच्यासाठी प्रार्थना कर व परमेश्वर आमचा देव सांगेल ते सर्व आम्हांला कळव म्हणजे त्याप्रमाणे आम्ही करू.


हायहाय! लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकान्तात बसली आहे! राष्ट्रांमध्ये जी थोर तिला कसे वैधव्य आले आहे! परगण्यांमध्ये जी राणी ती कशी करभार देणारी झाली आहे!


तरी त्यांच्यापैकी थोडक्या लोकांना तलवार, दुष्काळ व मरी ह्यांपासून मी वाचवीन; म्हणजे ते ज्या ज्या राष्ट्रांत जातील तेथे आपल्या अमंगळ कृत्यांची कहाणी सांगतील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


जरी ते राष्ट्रात देणग्या देत फिरतात तरी मी आता त्यांना एकत्र करीन, ते राजाधिराजाच्या कारभाराने घटत जातील.


मी तुमच्यावर वनपशू सोडीन आणि ते तुमची मुले उचलून नेतील, तुमच्या गुराढोरांचा नाश करतील, तुमची संख्या अगदी कमी करतील आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.


आणि असे झाले की त्यांनी देशातील झाडपाला खाऊन फस्त केला तेव्हा मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करतो, क्षमा कर, याकोबाचा कसा टिकाव लागेल? कारण तो दुर्बळ आहे.”


आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.


तेव्हा शिमोनाने म्हटले, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा.”


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही म्हणून आकाशातील तार्‍यांप्रमाणे तुम्ही अगणित झाला तरी थोडके उराल.


तुमचे भले करावे आणि तुमची संख्या वाढवावी ह्यात जसा परमेश्वराला आनंद होत असे तसाच आनंद तुमचा नाश व निःपात करण्यात त्याला होईल; आणि जी भूमी वतन करून घ्यायला तुम्ही जात आहात तेथून तुमचे उच्चाटन होईल.


परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांत विखरील; ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हांला घालवील तेथे तुमची संख्या अल्प राहील.


तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.


तेव्हा सर्व लोक शमुवेलास म्हणाले, “आपल्या दासांप्रीत्यर्थ आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना करा म्हणजे आम्ही मरणार नाही; आम्ही राजा मागितला त्यामुळे आमच्या एकंदर पातकांना हे एक दुष्कर्म आम्ही जोडले आहे.”


तुमच्यासाठी प्रार्थना करायची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो; मी तुम्हांला चांगला व सरळ मार्ग दाखवतो.


इस्राएल लोक शमुवेलाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवावे म्हणून त्याची काकळूत करण्याचे थांबवू नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan