Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 42:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तर अहो यहूदाचे अवशिष्ट लोकहो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मिसर देशात जाऊन तेथे काही दिवस राहण्याचा तुमचा निश्‍चय असला तर

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तर आता यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तुम्ही खरोखर मिसर देशामध्ये जाऊन आणि तेथे राहण्याचे निश्चित करता,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तर तुम्हाला याहवेहचे हे वचन मिळत आहे, हे यहूदीयाच्या अवशेषा, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘जर तुम्ही इजिप्तमध्ये जाण्याचा व तिथेच राहण्याचा हट्ट कराल,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 42:15
8 Iomraidhean Croise  

मग तो आपले सर्वकाही घेऊन पळून गेला; तो उठून फरात नदीपलीकडे गेल्यावर त्याने गिलाद डोंगराकडे जाण्याचा रोख दाखवला.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा जे राष्ट्र व राज्य करणार नाही आणि बाबेलच्या राजाच्या जोखडाला मान देणार नाही, अशा राष्ट्राचा त्याच्या हातून मी अंत करीपर्यंत तलवार, दुष्काळ आणि मरी ह्यांनी मी समाचार घेईन.


ज्या माणसांनी मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा निश्‍चय केला आहे ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी मरतील; मी त्यांच्यावर अरिष्ट आणीन तेव्हा त्यांच्यापैकी एकही उरणार नाही किंवा सुटणार नाही.


यिर्मया त्या सर्व लोकांना व सर्व स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही सगळे लोक मिसर देशात आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.


तो आपल्या सार्‍या राज्याच्या बलासह येईल; तरी तो त्याच्याबरोबर करारमदार करील; तो त्यांना स्त्रियांची कन्या भ्रष्ट करण्यास देईल; ती त्याच्या पक्षाला टिकून राहणार नाही, ती त्याची होणार नाही.


पुढे असे झाले की, त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने यरुशलेमेस जाण्याच्या दृढनिश्‍चयाने तिकडे आपले तोंड वळवले.


मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत; घोडदळ वाढवण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घ्यायला लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हांला सांगितलेच आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan