Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 42:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 आणि असे म्हणाल की, ‘नाही, आम्ही मिसर देशात जाऊ, तेथे आमच्या नजरेस युद्ध पडणार नाही, तेथे कर्ण्याचा शब्द आम्हांला ऐकू येणार नाही व भाकरीवाचून आम्ही उपाशी मरणार नाही, आम्ही तेथेच वस्ती करू;’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तुम्ही कदाचित् म्हणाल, नाही, आम्ही मिसर देशामध्ये जाऊन राहू, तेथे आम्हास कोणतेही युध्द दिसणार नाही, तेथे आम्ही रणशिंगाचा आवाज ऐकणार नाही आणि तेथे आम्ही अन्नासाठी भुकेले होणार नाही. आम्ही तेथे राहू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आणि आम्ही इजिप्तमध्ये जाऊन राहू, जिथे आम्हाला लढाई, रणशिंगे ऐकू येणार नाहीत किंवा अन्नाची भूक यापासून सुटका मिळेल,’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 42:14
15 Iomraidhean Croise  

इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे.”


पण तेथे लोकांना खूप तहान लागली आणि ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, “आम्हांला, आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकायला तू आम्हांला मिसर देशातून बाहेर का आणलेस?”


तुम्ही म्हणाला, “नाही! आम्ही घोड्यावर बसून पळू,” म्हणून तुम्हांला पळावे लागेल; तुम्ही म्हणाला, “आम्ही चपळ घोड्यांवर बसू,” म्हणून तुमचा पाठलाग करणारे चपळ बनतील.


ती फारोचा आश्रय करण्यासाठी व मिसराच्या छायेत लपण्यासाठी माझ्या तोंडचे वचन विचारून न घेता मिसराची वाट धरतात!


जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय!


माझी आतडी तुटतात हो तुटतात! माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत! माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे! माझ्याने स्तब्ध राहवत नाही! कारण माझ्या जिवा, कर्ण्याचा नाद, रणशब्द तू ऐकला आहेस.


मी ध्वजा कोठवर पाहू? कर्ण्याचा शब्द कोठवर ऐकू?


ते मिसर देशास जाण्याच्या हेतूने बेथलेहेमनजीक गेरूथ-किम्हाम येथे जाऊन राहिले;


ते मिसर देशास गेले, कारण त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही; ते तहपन्हेस येथे जाऊन पोहचले.


तलवारीने आमचा निःपात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हांला ह्या देशात का नेत आहे? आमच्या बायकामुलांची लूट होईल! आम्ही मिसर देशात परत जावे हेच बरे नव्हे काय?”


ते आपसात म्हणाले, “आपण कोणाला तरी पुढारी करून मिसर देशाला परत जाऊ या.”


दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशातून काढून तू आम्हांला ह्या रानात मारून टाकण्यासाठी आणलेस हे काय थोडे झाले म्हणून तू आमच्यावर अधिकारही गाजवतोस?


मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत; घोडदळ वाढवण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घ्यायला लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हांला सांगितलेच आहे.


‘जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल’ असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल, पण त्यामुळे सुक्याबरोबर ओलेही जळून जाईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan