Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 42:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा सैन्यांचे सर्व नायक आणि योहानान बिन कारेह व यजन्या बिन होशाया आणि लहानथोर सर्व लोक जवळ येऊन,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नंतर तेव्हा सर्व सेनाधिकारी आणि कारेहाचा मुलगा योहानान, होशायाचा मुलगा यजन्या आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक यिर्मया संदेष्ट्याकडे पोहचले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग सर्व सैन्यप्रमुख म्हणजे कारेहाचा पुत्र योहानान, होशयाहचा पुत्र यजन्याह, व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 42:1
25 Iomraidhean Croise  

बाबेलच्या राजाने गदल्यास सुभेदार नेमले हे सेनानायकांनी व त्याच्या लोकांनी ऐकले, तेव्हा इश्माएल बिन नथन्या, योहानान बिन कारेह, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी आणि याजन्या बिन माकाथी व त्यांचे सर्व पुरुष मिस्पा येथे गदल्या ह्याच्याकडे आले.


प्रभू म्हणाला आहे की, “हे लोक माझ्यासमीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात, आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात.


हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नाव आहे, तू यहूदाच्या झर्‍यातून निघाला आहेस; तू परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करतोस, पण सत्याने व नीतिमत्तेने नव्हे.


तेव्हा सिद्कीया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मया संदेष्ट्याकडे सांगून पाठवले की, “आमच्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे प्रार्थना कर.”


ह्याखेरीज योहानान बिन कारेह व रानावनात असलेले सर्व सेनानायक हे मिस्पा येथे गदल्याकडे आले.


तेव्हा ते, म्हणजे इश्माएल बिन नथन्या, कारेहपुत्र योहानान व योनाथान, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी रफै ह्याचे पुत्र व याजन्या (हा एका माकाथीचा पुत्र) हे व त्याचे लोक गदल्याकडे मिस्पास आले.


मग योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर असलेले सैन्याचे सर्व नायक ह्यांनी इश्माएल बिन नथन्या ह्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांची बातमी ऐकली.


मग गदल्या बिन अहीकाम ह्याला मारल्यावर इश्माएल बिन नथन्या ह्याने जे योद्धे, स्त्रिया, मुले व खोजे ह्यांना धरून मिस्पा येथून नेले होते. त्यांना योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर असलेले सैन्याचे सर्व नायक ह्यांनी मिस्पा येथे त्यांच्या हातून सोडवून गिबोनाहून परत आणले त्या सर्व अवशिष्ट लोकांना घेऊन,


त्यांना खास्द्यांचे भय होते, कारण बाबेलच्या राजाने ज्या गदल्या बिन अहीकाम ह्याला देशाचा अधिपती नेमले होते त्याला इश्माएल बिन नथन्या ह्याने जिवे मारले होते.


ह्या प्रकारे तुम्ही आपला जीव धोक्यात घातला आहे; कारण परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे मला पाठवून तुम्ही म्हटले की, ‘परमेश्वर आमचा देव ह्याची आमच्यासाठी प्रार्थना कर व परमेश्वर आमचा देव सांगेल ते सर्व आम्हांला कळव म्हणजे त्याप्रमाणे आम्ही करू.


तेव्हा योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबरचे सैन्यांचे सर्व नायक व लहानथोर सर्व लोक ह्यांना त्याने बोलावले,


तेव्हा अजर्‍या1 बिन होशाया, योहानान बिन कारेह आणि सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाला म्हणाली, “तू खोटे बोलतोस; तुम्ही मिसर देशात जाऊन काही दिवस राहू नका असे कळवण्यास परमेश्वर आमचा देव ह्याने तुला पाठवले नाही;


मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा यहूदाच्या अवशिष्ट लोकांनी निश्‍चय केला त्या सर्वांवर माझा हात पडून त्यांचा नायनाट होईल; मिसर देशात ते पडतील; तलवारीने व दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल; लहानथोर तलवारीने व दुष्काळाने मृत्यू पावतील; ते निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय होतील.


“कारण लहानथोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत; संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात.


ह्यामुळे मी त्यांच्या स्त्रिया इतरांना देईन, त्यांची शेते नव्या वहिवाटदारांना देईन; कारण लहानापासून थोरापर्यंत ते झाडून सर्व लोभवश झाले आहेत; संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत ते सर्व कपट करतात.


मग आत्म्याने मला उचलून घेऊन परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वाभिमुख पूर्वेकडील द्वाराकडे आणले; तेव्हा पाहा, वेशीपुढे पंचवीस इसम होते; त्यांच्यामध्ये याजन्या बिन अज्जूर व पलट्या बिन बनाया हे लोकनायक माझ्या दृष्टीस पडले.


लोक येतात तसे ते तुझ्याकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुझ्यापुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे.


त्यांच्यापुढे इस्राएल घराण्याच्या वडिलांतले सत्तर पुरुष उभे असून त्यांच्यामध्ये याजन्या बिन शाफान हा उभा होता; त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते; तेथे धूपाच्या धुराचा दाट ढग वर जात होता.


‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व] ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.


लहानापासून थोरापर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की, “जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan