Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 41:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ते शहराच्या मध्यभागी आल्यावर असे झाले की इश्माएल बिन नथन्या ह्याने व त्याच्या साथीदारांनी त्यांना जिवे मारून विहिरीत फेकून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मग असे झाले की, जेव्हा ते नगराच्या मध्ये आले असता नथन्याचा मुलगा इश्माएल याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी त्यांची कत्तल करून आणि त्यांना खड्ड्यात फेकून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मग ते सर्वजण शहराच्या आत आल्यावर, नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याची माणसे यांनी त्यांच्यापैकी दहा जणांना सोडून बाकी सर्वांना जिवे मारले व त्यांची प्रेते एका विहिरीत टाकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 41:7
11 Iomraidhean Croise  

त्याचा सरदार रमाल्याचा पुत्र पेकह ह्याने त्याच्याशी फितुरी करून शोमरोनाच्या राजवाड्याच्या मनोर्‍यात त्याला व त्याच्याबरोबर अर्गोब व अरये ह्यांना वधले; पेकहाबरोबर पन्नास गिलादी लोक होते; त्यांना वधून त्याच्या जागी तो राजा झाला.


हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी माणसे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत; मी तर तुझ्यावर भाव ठेवीन.


कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात.


पण तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे आपल्या थडग्यापासून दूर झुगारून दिले आहे; वधलेले, तलवारीने विंधलेले, गर्तेच्या धोंड्यामध्ये पडलेले ह्यांनी तू वेष्टला आहेस. पायांखाली तुडवलेल्या मढ्यासारखा तू झाला आहेस.


त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात; निर्दोष रक्तपात करण्यास त्वरा करतात; त्यांच्या कल्पना अधर्माच्या असतात; त्यांच्या मार्गात नाश व विध्वंस असतात.


तिच्यातले सरदार भक्ष्य फाडून खाणार्‍या लांडग्यांसारखे आहेत; ते अन्यायाने कमाई करण्यासाठी रक्तपात करतात, मानवी प्राण्यांचा विनाश करतात.


“त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्याकरता उतावळे झाले आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan