Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 41:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 शखेम, शिलो व शोमरोन येथून ऐंशी माणसे आली; त्यांच्या दाढ्या मुंडलेल्या, त्यांची वस्त्रे फाडलेली, त्यांच्या अंगास घाय झालेले, व परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी हाती अन्नार्पणे व ऊद असलेली अशी ती आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 शखेमातून काही माणसे, शिलोतून व शोमरोनातून ऐंशी माणसे त्यांच्या दाढ्या कापलेल्या, त्यांचे कपडे फाडलेले आणि स्वतःला जखम करून घेतलेले, परमेश्वराच्या घरात आणण्यासाठी त्यांच्या हातात अन्नार्पण व धूप होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 याहवेहच्या मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी शेखेम, शिलोह व शोमरोनात येथून ऐंशी माणसे मिस्पाहच्या रोखाने आली. त्यांच्या दाढ्या काढल्या होत्या. त्यांनी आपले कपडे फाडले होते, तसेच त्यांनी स्वतःला जखमा करून घेतल्या होत्या; त्यांनी बरोबर अर्पणे व ऊद आणली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 41:5
28 Iomraidhean Croise  

याकोब पदन-अरामापासून प्रवास करत कनान देशातील शखेम नावाच्या नगरास सुखरूप पोहचला, आणि नगरापुढे तळ देऊन राहिला.


तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी ह्याचा मुलगा शखेम ह्याची नजर तिच्यावर गेली. तो तिला घेऊन गेला आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.


ह्यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारायला शखेमास गेले.


तेव्हा हानूनाने दाविदाच्या सेवकांना पकडले व त्यांची अर्धीअर्धी दाढी काढवून व त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापून टाकून त्यांना पाठवून दिले.


रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल तेथे गेले होते.


यराबाम एफ्राइमाच्या पहाडी प्रदेशात शखेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनुएल नगराची त्याने मजबुती केली.


त्याने शेमर ह्याच्याकडून शोमरोन डोंगर दोन किक्कार1 रुपे देऊन घेतला; त्या डोंगरावर त्याने एक नगर वसवले आणि त्या वसवलेल्या नगराला त्या डोंगराचा मूळचा मालक शेमर ह्याच्या नावावरून शोमरोन असे नाव दिले.


यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा पुत्र अहाब इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने इस्राएलावर शोमरोन येथे बावीस वर्षे राज्य केले.


त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा जाळून टाकला, तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.


तेव्हा हानूनाने दाविदाच्या चाकरांना पकडून त्यांचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापून टाकून त्यांना घालवून दिले.


तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहेत तिची धूळधाण पाहून ते हळहळतात.


त्याने शिलो येथील निवासमंडप म्हणजे मानवामध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला;


बईथ व दीबोन उच्च स्थानी विलाप करण्यास चढून जात आहेत; नबो व मेदबा ह्यांवर जाऊन मवाब आक्रंदन करीत आहे; सर्वांची डोकी मुंडलेली आहेत; प्रत्येकाची दाढी काढलेली आहे.


ह्या देशातील लहानथोर मरतील; कोणी त्यांना पुरणार नाहीत, कोणी त्यांच्याकरता शोक करणार नाहीत, कोणी त्यांच्यामुळे आपल्या शरीरांना घाय करणार नाहीत, त्यांच्यामुळे आपली डोकी भादरणार नाहीत.


त्याने गदल्याचा वध केला ही गोष्ट बाहेर फुटण्यापूर्वी दुसर्‍या दिवशी असे झाले की,


गज्जाचे वपन झाले आहे; त्यांच्या खोर्‍यांतले उरलेले अष्कलोन नष्ट झाले आहे; तू कोठवर आपणास जखमा करून घेशील?


प्रत्येक डोके भादरले आहे; प्रत्येक दाढी मुंडली आहे; सर्वांच्या हातांवर घाव आहेत, कंबरांना गोणपाट आहे.


तर ज्या स्थळी माझे नाम राहावे असे मी प्रथम योजले होते त्या शिलोस जा व माझे लोक इस्राएल ह्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचे काय केले ते पाहा.


म्हणून ज्याला माझे नाम दिले आहे व ज्यावर तुमची श्रद्धा आहे त्या ह्या मंदिराचे आणि तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना मी दिलेल्या ह्या स्थळाचे, शिलोचे केले तसे करीन;


आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. मृतासाठी आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा मुंडण करून घेऊ नका,


मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला; देश त्यांच्या हाती आला होता.


योसेफाच्या अस्थी इस्राएल लोकांनी मिसर देशातून आणल्या होत्या त्या शखेम येथे पुरल्या. ती जागा याकोबाने शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून शंभर कसीटा (एक चलन) देऊन विकत घेतली होती. हे ठिकाण योसेफाच्या वंशजांचे वतन झाले.


मीखाने केलेली कोरीव मूर्ती त्यांनी आपल्यासाठी स्थापली होती व देवाचे मंदिर शिलो येथे असेपर्यंत ती तेथे होती.


यरुब्बालाचा मुलगा अबीमलेख शखेम येथे आपल्या आईच्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांना व आपल्या आजोळच्या सर्व माणसांना म्हणाला,


शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवत असे; तेव्हा ती रडे व काही खात नसे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan