Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 41:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 सातव्या महिन्यात असे झाले की इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा, जो राजवंशातला असून राजाच्या मुख्य अंमलदारांपैकी होता तो व त्याच्याबरोबर दहा माणसे ही गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे मिस्पा येथे आली; मिस्पा येथे ते एका पंक्तीला बसून जेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 पण सातव्या महिन्यात असे झाले की, अलीशामाचा मुलगा नथन्या, याचा मुलगा इश्माएल, जो राजघराण्यातला होता आणि राजाचे काही अधिकारी, त्याच्याबरोबर त्याच्या दहा मनुष्यांना घेऊन मिस्पात अहीकामाचा मुलगा गदल्याकडे आले. त्यांनी मिस्पा येथे एकत्रित बसून भोजन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याह याचा पुत्र, इश्माएल, जो राजघराण्यातील व राजाच्या उच्चाधिकार्‍यांपैकी एक होता. हा आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन मिस्पाह येथे अहीकामचा पुत्र गदल्याहस भेटण्यासाठी आला. ते सर्व भोजन करीत असताना,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 41:1
25 Iomraidhean Croise  

अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला.


अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला आहे असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला.


यहूदा देशातील जे लोक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने राहू दिले होते त्यांच्यावर त्याने गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याला सुभेदार नेमले.


सातव्या महिन्यात राजवंशातला इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा ह्याने दहा माणसांसह येऊन गदल्याला ठार मारले; तसेच मिस्पा येथे त्याच्याबरोबर असलेले यहूदी व खास्दी ह्यांनाही त्याने ठार मारले.


अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला.


मी केलेल्या बर्‍याची परतफेड त्यांनी वाइटाने केली, व माझ्या प्रेमाची फेड द्वेषाने केली.


जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे.


गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणार्‍यांजवळ ज्ञान असते.


क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली पण प्रेमसंशयापुढे कोण टिकेल?


तेव्हा तो राजगृहात, लेखकाच्या दिवाणखान्यात गेला; तर तेथे सर्व सरदार बसले होते; अलीशामा लेखक, दलाया बिन शमाया, एलनाथान बिन अखबोर, गमर्‍या बिन शाफान, सिद्कीया बिन हनन्या व इतर सर्व सरदार तेथे होते.


मग ते चौकात राजाकडे गेले; तो पट त्यांनी अलीशामा लेखकाच्या दिवाणखान्यात ठेवला होता; त्यांनी ती सर्व वचने राजाच्या कानी पाडली.


ह्यांनी माणसे पाठवून यिर्मयाला पहारेकर्‍यांच्या चौकातून काढले व घरी न्यावे म्हणून त्याला गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या स्वाधीन केले; मग तो लोकांत जाऊन राहिला.


ह्याखेरीज योहानान बिन कारेह व रानावनात असलेले सर्व सेनानायक हे मिस्पा येथे गदल्याकडे आले.


तो परतला नाही तोच तो त्याला म्हणाला, “गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याला बाबेलच्या राजाने यहूदाच्या नगरांवर अधिपती नेमले आहे, त्याच्याकडे परत जा व त्याच्याबरोबर लोकांमध्ये जाऊन वस्ती कर; किंवा तुला सोईचे वाटेल तेथे जा.” मग गारद्यांच्या नायकाने त्याला अन्नसामग्री व इनाम देऊन रवाना केले.


तेव्हा यिर्मया निघून मिस्पा येथे गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे गेला व देशात जे लोक उरले होते त्यांच्यामध्ये जाऊन राहिला.


बाबेलच्या राजाने गदल्या बिन अहीकाम ह्याला देशाचा अधिपती नेमून पुरुष, स्त्रिया, मुले, देशातील सर्व लाचार व ज्या कोणाला पकडून बाबेलास नेले नव्हते ते सर्व त्याच्या स्वाधीन केले आहेत असे जेव्हा रानावनात असलेल्या सेनानायकांनी व त्यांच्या लोकांनी ऐकले,


तेव्हा ते, म्हणजे इश्माएल बिन नथन्या, कारेहपुत्र योहानान व योनाथान, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी रफै ह्याचे पुत्र व याजन्या (हा एका माकाथीचा पुत्र) हे व त्याचे लोक गदल्याकडे मिस्पास आले.


तेव्हा त्याने राजवंशातल्या एका पुरुषास निवडून त्याच्याबरोबर करार केला व त्याच्याकडून प्रतिज्ञा करवली आणि त्याने देशातले सर्व कर्ते पुरुषही नेले;


मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहीत आहेत; तरी ‘ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan