Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 40:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा ते, म्हणजे इश्माएल बिन नथन्या, कारेहपुत्र योहानान व योनाथान, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी रफै ह्याचे पुत्र व याजन्या (हा एका माकाथीचा पुत्र) हे व त्याचे लोक गदल्याकडे मिस्पास आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग ते मिस्पा येथे गदल्याकडे गेले. ती माणसे नथन्याचा मुलगा इश्माएलाची होती; कारेहाचे मुले योहानान व योनाथान; तन्हुमेथाचा मुलगा सराया; रफैची मुले नटोफाथी आणि माकाथाचा मुलगा याजन्या ते व त्यांची माणसे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कोरहाचे पुत्र योहानान व योनाथान, तन्हुमेथचा पुत्र सेरायाह, नटोफाथी एफै याचे पुत्र, व माकाथी यजन्याह व त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 40:8
29 Iomraidhean Croise  

दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी बेथ-रहोब येथले अरामी व सोबा येथले अरामी मिळून वीस हजार पायदळ, माका राजाचे एक हजार शिपाई व तोबाचे बारा हजार शिपाई मोल देऊन बोलावले.


तेव्हा अम्मोनी लोकांनी बाहेर पडून वेशीनजीक युद्धासाठी व्यूह रचला; इकडे सोबा व रहोब येथले अरामी आणि तोब व माका ह्यांचे शिपाई निराळ्या ठिकाणी मैदानात होते.


माकाथीचा पुत्र अहसबय ह्याचा पुत्र अलीफलेट, अहीथोफेल गिलोनी ह्याचा पुत्र अलीयम,


बाबेलच्या राजाने गदल्यास सुभेदार नेमले हे सेनानायकांनी व त्याच्या लोकांनी ऐकले, तेव्हा इश्माएल बिन नथन्या, योहानान बिन कारेह, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी आणि याजन्या बिन माकाथी व त्यांचे सर्व पुरुष मिस्पा येथे गदल्या ह्याच्याकडे आले.


सातव्या महिन्यात राजवंशातला इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा ह्याने दहा माणसांसह येऊन गदल्याला ठार मारले; तसेच मिस्पा येथे त्याच्याबरोबर असलेले यहूदी व खास्दी ह्यांनाही त्याने ठार मारले.


महरय नटोफाथी, बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेद,


कालेबाची उपपत्नी माका हिला शेबेर व तिर्‍हना हे झाले.


सल्माचे वंशज : बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-यवाब, आणि अर्धे मानहतवासी म्हणजे सारी;


जरूब्बाबेलबरोबर आले ते येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बाना. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची ही मोजदाद आहे :


नटोफाचे लोक छप्पन्न,


बेथलेहेम व नटोफा येथील माणसे एकशे अठ्ठ्याऐंशी.


सरदारांनी यिर्मयावर संतापून त्याला मार दिला व योनाथान लेखकाच्या घरात त्याला अटकेत ठेवले, त्यांनी त्या घराचा तुरुंग केला होता.


आता, अहो माझे स्वामीराज, माझे ऐका; माझी विनंती आपणांला मान्य होवो; मला त्या योनाथान लेखकाच्या घरात परत पाठवू नका, पाठवाल तर मी तेथे मरेन.”


तर तू त्यांना म्हण, राजाने मला योनाथानाच्या घरी मरण्यास परत पाठवू नये असा मी त्याला अर्ज केला.”’


त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशांत जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,


ह्याखेरीज योहानान बिन कारेह व रानावनात असलेले सर्व सेनानायक हे मिस्पा येथे गदल्याकडे आले.


ते त्याला म्हणाले, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस ह्याने आपला जीव घेण्यासाठी नथन्याचा पुत्र इश्माएल ह्याला पाठवले आहे हे आपणांला ठाऊक आहे काय?” पण गदल्या बिन अहीकाम ह्याला त्यांचे खरे वाटेना.


तेव्हा योहानान बिन कारेह गदल्यास मिस्पा येथे गुप्तपणे म्हणाला, “मला जाऊन इश्माएल बिन नथन्या ह्याला ठार करू द्या; हे कोणाला कळणार नाही; त्याने आपला प्राण का घ्यावा? घेतल्यास आपणांकडे जमलेले सर्व यहूदी पांगतील व यहूदाच्या अवशेषाचा नाश होईल.”


तेव्हा यिर्मया निघून मिस्पा येथे गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे गेला व देशात जे लोक उरले होते त्यांच्यामध्ये जाऊन राहिला.


सातव्या महिन्यात असे झाले की इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा, जो राजवंशातला असून राजाच्या मुख्य अंमलदारांपैकी होता तो व त्याच्याबरोबर दहा माणसे ही गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे मिस्पा येथे आली; मिस्पा येथे ते एका पंक्तीला बसून जेवले.


मग योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर असलेले सैन्याचे सर्व नायक ह्यांनी इश्माएल बिन नथन्या ह्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांची बातमी ऐकली.


त्या प्रसंगी इश्माएल बिन नथन्या व त्याच्याबरोबरची दहा माणसे ह्यांनी उठून गदल्या बिन अहीकाम बिन शाफान, ज्याला बाबेलच्या राजाने देशावर अधिपती म्हणून नेमले होते, त्याला तलवारीने ठार मारले.


तेव्हा सैन्यांचे सर्व नायक आणि योहानान बिन कारेह व यजन्या बिन होशाया आणि लहानथोर सर्व लोक जवळ येऊन,


तेव्हा योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबरचे सैन्यांचे सर्व नायक व लहानथोर सर्व लोक ह्यांना त्याने बोलावले,


तेव्हा अजर्‍या1 बिन होशाया, योहानान बिन कारेह आणि सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाला म्हणाली, “तू खोटे बोलतोस; तुम्ही मिसर देशात जाऊन काही दिवस राहू नका असे कळवण्यास परमेश्वर आमचा देव ह्याने तुला पाठवले नाही;


तर ज्या सर्व राष्ट्रांत त्यांना घालवले होते त्यांतून यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्या सर्वांना योहानान बिन कारेह व सर्व सेनानायक ह्यांनी आपल्याबरोबर नेले;


मनश्शेचा मुलगा याईर ह्याने गशूरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला आणि बाशानाला आपले नाव म्हणजे हव्वोथ-याईर असे ठेवले, तेच आजवर चालत आहे.)


आणि हर्मोन पर्वत, सलका, गशूरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंतचा सगळा बाशान प्रांत आणि हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत अर्ध्या गिलादावर त्याची सत्ता होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan