Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 40:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 परमेश्वराने ते आणले व आपल्या म्हणण्याप्रमाणे केले. तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले व त्याची वाणी मानली नाही म्हणून हे तुमच्यावर आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि परमेश्वराने ते आणले आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याने केले आहे; कारण तुम्ही लोकांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आहे आणि त्याची वाणी पाळली नाही. म्हणून या गोष्टी तुम्हा लोकांविरूद्ध घडल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि जसे त्यांनी पूर्वी सांगितलेच होते, आता तसा हा अनर्थ ओढवला आहे; हे सर्व यामुळे घडले, कारण या लोकांनी याहवेहची आज्ञा न पाळता त्यांच्याविरुद्ध पाप केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 40:3
12 Iomraidhean Croise  

पण जेव्हा जेव्हा त्यांना स्वास्थ्य मिळे तेव्हा तेव्हा ते तुझ्यासमोर दुष्कर्म करीत; ह्यामुळे तू त्यांना शत्रूंच्या हाती दिलेस व त्यांनी त्यांच्यावर सत्ता केली; तरी त्यांनी तुझ्याकडे वळून तुझा धावा केला, तो तू स्वर्गातून ऐकला आणि तुझ्या दयेच्या कृत्यांना अनुसरून तू त्यांना अनेक वेळा मुक्त केलेस.


आमच्यावर जे काही गुदरले आहे त्याच्या बाबतीत तू न्यायशील आहेस; तू आमच्याशी सत्यतेने वागलास पण आम्ही दुष्टाई केली आहे.


इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांनी बआलमूर्तीस धूप जाळून मला चिडवण्याचे दुष्कर्म केले आहे; म्हणून ज्या सेनाधीश परमेश्वराने तुला लावले त्याने तुला अरिष्टाची शिक्षा सांगितली आहे.”


बहुत राष्ट्रांतील लोक ह्या नगराजवळून जातील; ते एकमेकांना म्हणतील की, ‘परमेश्वराने ह्या मोठ्या नगराचे असे का केले?’


“जा, एबद-मलेख कूशी ह्याला सांग की, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी आपल्या वचनाप्रमाणे ह्या नगराचे हित नव्हे तर अहित होईल असे करीन; त्या दिवशी तुझ्यादेखत ती वचने पूर्ण होतील.


तुम्ही धूप जाळला, परमेश्वराविरुद्ध पाप केले, परमेश्वराची वाणी ऐकली नाही, त्याचे नियमशास्त्र, त्याचे विधी व त्याचे निर्बंध ह्यांनी तुम्ही चालला नाहीत; म्हणून तुमच्यावर हे अरिष्ट आले आहे हे आज दिसतच आहे.”


ज्यांना ते सापडले त्यांनी त्या सर्वांना खाऊन टाकले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘ह्याबद्दल आम्हांला काही दोष नाही, कारण परमेश्वर, जो न्यायाचे वसतिस्थान, जो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद त्याच्याविरुद्ध त्यांनी पातक केले आहे.’


परमेश्वराने योजल्याप्रमाणे केले आहे; त्याने प्राचीन काळापासून दिलेली ताकीद अंमलात आणली आहे; त्याने मोडतोड केली, गय केली नाही; त्याने शत्रूस तुझ्यावर हर्षवले आहे, त्याने तुझ्या वैर्‍यांचा उत्कर्ष केला आहे.


की, आपल्या हटवादीपणाने पश्‍चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?


आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.


तेव्हा लोक म्हणतील की, ‘ह्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून ह्यांना काढून आणतेवेळी ह्यांच्याशी जो करार केला होता तो ह्यांनी मोडला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan