Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 40:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तेव्हा योहानान बिन कारेह गदल्यास मिस्पा येथे गुप्तपणे म्हणाला, “मला जाऊन इश्माएल बिन नथन्या ह्याला ठार करू द्या; हे कोणाला कळणार नाही; त्याने आपला प्राण का घ्यावा? घेतल्यास आपणांकडे जमलेले सर्व यहूदी पांगतील व यहूदाच्या अवशेषाचा नाश होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग मिस्पा येथे एकांतात कारेहाचा मुलगा योहानान गदल्याशी बोलला की, “मला नथन्याचा मुलगा इश्माएल याला ठार मारण्याची परवानगी दे. कोणी माझ्यावर संशय घेणार नाही. त्याने तुला का मारावे? जे सर्व यहूदी तुझ्याभोवती गोळा झाले आहेत त्यांना देशात पांगण्याची आणि यहूदाचे उरलेले अवशेष नष्ट होण्याची परवानगी का देतोस?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 नंतर कारेहाचा पुत्र योहानानने मिस्पाह येथे गदल्याहशी गुप्तपणे चर्चा केली व त्याला म्हटले, “मी नथन्याहचा पुत्र इश्माएलचा वध करतो, कोणालाही कळणार नाही. त्याला तुमचा वध का करू द्यावा, जे यहूदी गोळा होऊन तुझ्याकडे परतले आहेत, त्यांची पांगापांग होऊन उरलेल्या यहूदीयाचा नाश का होऊ द्यावा?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 40:15
10 Iomraidhean Croise  

लोकांनी म्हटले, “आपण येऊ नये; कारण आम्ही पळून गेलो तर त्याचे त्यांना काही वाटणार नाही; आमच्यातले अर्धे लोक मेले तरी त्यांना काही वाटायचे नाही; पण आपण तर आमच्यातल्या दहा हजारांच्या ठिकाणी आहात; म्हणून आपण नगरात राहूनच आम्हांला कुमक पाठवावी हे उत्तम.”


पण सरूवेचा पुत्र अबीशय ह्याने दाविदाचा बचाव केला; त्या पलिष्ट्याला त्याने ठार मारले. मग दाविदाच्या लोकांनी त्याला शपथ घालून सांगितले, “पुन्हा आपण आमच्याबरोबर लढाईला येऊ नका; इस्राएलाचा दीप आपण मालवू नये.”


‘ह्याच्या घरी मांसान्नाने तृप्ती झाली नाही असा एक तरी आढळेल,’ असे माझ्या डेर्‍यातल्या लोकांनी म्हटले नसेल,


तेव्हा ते, म्हणजे इश्माएल बिन नथन्या, कारेहपुत्र योहानान व योनाथान, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी रफै ह्याचे पुत्र व याजन्या (हा एका माकाथीचा पुत्र) हे व त्याचे लोक गदल्याकडे मिस्पास आले.


यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले, “आमची एवढी विनंती मान्य करा; आपणाला दिसत आहे की, आम्ही बहुतांपैकी थोडेच राहिलो आहोत; तर आम्हा सर्व अवशिष्ट लोकांसाठी परमेश्वर आपला देव ह्याच्याकडे प्रार्थना करा की,


प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हांला हितावह आहे, हेही तुम्ही लक्षात आणत नाही.”


तेव्हा दाविदाला त्याचे लोक म्हणाले, “परमेश्वराने आपणाला सांगितले होते की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर; हे घडून येण्याचा दिवस हाच आहे.” तेव्हा दाविदाने उठून शौलाच्या झग्याचा काठ हळूच कापून घेतला.


तेव्हा अबीशय दाविदाला म्हणाला, “देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे; तर आता मला त्याच्या भाल्याने त्याच्यावर असा एकच वार करू द्या की तो त्याला भेदून जमिनीत शिरेल; भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan