Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 40:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशांत जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशात जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलाच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 यहूदीया प्रांतामध्ये अजून काही लोक उरले आहेत, बाबेलच्या राजाने सर्वांनाच कैद करून नेले नाही व शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याह हा राज्यपाल म्हणून नियुक्त झाला आहे, असे मोआब, अम्मोन, एदोम, या प्रांतात व आजूबाजूच्या देशात असलेल्या यहूद्यांनी ऐकले, तेव्हा

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 40:11
23 Iomraidhean Croise  

म्हणून एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसाव हाच अदोम.


ते पश्‍चिमेकडे पलिष्ट्यांच्या खांद्यावर (खालाटीवर) झडप घालतील; ते एकत्र होऊन पूर्वदेशीयांना लुटतील; अदोम व मवाब ह्यांना हस्तगत करतील; आणि अम्मोनी त्यांना वश होतील.


माझ्या घालवून दिलेल्यांना तुझ्याजवळ राहू दे; मवाबाला लुटारूंपासून आसरा हो; कारण पिळून काढणारा नष्ट झाला आहे; नासधूस बंद झाली आहे; पायमल्ली करणारे देशातून नाहीतसे झाले आहेत.


पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप ह्यांचे विषय होतील.


तेव्हा इश्माएलाने मिस्पा येथे असलेले सर्व अवशिष्ट लोक पकडून नेले; राजकन्यांना व मिस्पा येथे राहिलेल्या सर्व लोकांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम ह्याच्या स्वाधीन केले होते त्यांना नेले; इश्माएल बिन नथन्या ह्याने त्यांना बंदिवान करून नेले व तो अम्मोनी लोकांकडे जाण्यास निघाला.


तर ज्या सर्व राष्ट्रांत त्यांना घालवले होते त्यांतून यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्या सर्वांना योहानान बिन कारेह व सर्व सेनानायक ह्यांनी आपल्याबरोबर नेले;


पुरुष, स्त्रिया, मुले, राजकन्या ह्यांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या हवाली केलेल्या सर्व लोकांना आणि यिर्मया संदेष्टा आणि बारूख बिन नेरीया ह्यांना त्यांनी नेले.


मिसर, यहूदा, अदोम, अम्मोनी, मवाबी व आपल्या केसांची चोंच काढणारे रानातले रहिवासी ह्या सर्वांना मी शासन करीन; कारण सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत व इस्राएलाचे सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे.”


प्रभू परमेश्वर म्हणतो, अदोमाने यहूदाच्या घराण्याचा सूड उगवण्याच्या बुद्धीने वर्तन केले, त्याने त्याच्यावर सूड उगवला हे पातक केले;


“मानवपुत्रा, अम्मोन वंशजांकडे आपले मुख करून त्यांच्याविषयी संदेश दे;


कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, तू इस्राएल देशाविषयी टाळ्या पिटल्यास, थैथै नाचलास व त्याची दुर्दशा पाहून तू मनापासून द्रोहपूर्वक आनंद केलास;


प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मवाब व सेईर म्हणतात की, ‘पाहा, यहूदाचे घराणे इतर राष्ट्रांसारखेच आहे;’


माझी मेंढरे सर्व डोंगरांवरून, सर्व उंच टेकड्यांवरून भटकत आहेत; देशभर माझी मेंढरे उपलब्ध आहेत; त्यांची कोणाला शुद्ध नाही, कोणी त्यांना शोधत नाही.


इस्राएल घराण्याचे वतन उद्ध्वस्त झाले तेव्हा तुला हर्ष वाटला, म्हणून मी तुझेही तसेच करीन; हे सेईर डोंगरा, तू वैराण होशील, एकदम सारा अदोम ओसाड होईल; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.


तू कायमचे वैर धरलेस आणि इस्राएल लोकांवर संकट आले तेव्हा, त्यांचा पापमूलक अंतसमय आला तेव्हा, त्यांना तलवारीच्या धारेच्या हवाली केलेस;


तुझ्या वस्तीचा तिसरा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील; तिसरा हिस्सा तुझ्याभोवती तलवारीने पडेल; व तिसरा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन; मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन.


त्यांतले थोडेसे केस घेऊन आपल्या वस्त्राच्या पदरी बांध.


मग इस्राएल लोकांनी कूच करून यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेकडे मवाबाच्या मैदानात तळ दिला.


इस्राएल लोक शिट्टिमात राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले.


त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवांच्या यज्ञांस बोलावू लागल्या; तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले.


नंतर अम्मोनी नाहाश ह्याने स्वारी करून याबेश-गिलादासमोर तळ दिला; तेव्हा याबेशचे सर्व लोक नाहाश ह्याला म्हणाले की, “आमच्याशी करारमदार कर म्हणजे आम्ही तुझे अंकित होऊ.”


तरीपण अम्मोन्यांचा राजा नाहाश आपल्यावर स्वारी करीत आहे असे तुम्ही पाहिले तेव्हा परमेश्वर तुमचा देव तुमचा राजा असूनही तुम्ही मला म्हणालात, ‘हे ठीक नाही, आमच्यावर राज्य करण्यास राजा असावा.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan