Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 40:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 पाहा, मी तर जे खास्दी आपल्याकडे येतील त्यांच्या तैनातीसाठी मिस्पा येथे राहतो; पण तुम्ही द्राक्षारस, ग्रीष्म ऋतूतील फळे व तेल ह्यांचा संचय करून आपल्या भांड्यांत भरून ठेवा व तुम्ही ताब्यात घेतलेल्या नगरात राहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि पाहा, जे खास्दी आम्हाजवळ येतील त्यांना भेटण्यास मी मिस्पात राहीन. म्हणून तुम्ही द्राक्षरस, उन्हाळी फळ व तेल यांचे उत्पादन करून आपल्या पात्रात साठवून ठेवावे. जी नगरे तुम्ही ताब्यात घेतली आहेत त्यामध्ये तुम्ही राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मी स्वतः मिस्पाह येथे राहीन. माझ्या कारभाराची पाहणी करावयास बाबिलोनचे अधिकारी येतील, तेव्हा त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेन. द्राक्षांचे पीक गोळा करा, उन्हाळी फळे व जैतुनाची फळे गोळा करा व ती साठवून ठेवा. तुमच्या मनाला येईल त्या शहरात राहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 40:10
15 Iomraidhean Croise  

दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला तेव्हा त्याला मफीबोशेथाचा चाकर सीबा हा भेटला; खोगीर घातलेली दोन गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, खिसमिसांचे शंभर घड, अंजिराच्या शंभर ढेपा व द्राक्षारसाचा एक बुधला अशी सामग्री त्याच्याजवळ होती.


आपले लोक धन्य होत; हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत.


आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.


वाळलेले गवत जाऊन त्या जागी कोवळे गवत उगवते, डोंगरांवरील हिरवळ कापून गोळा करतात.


म्हणून मी याजेराच्या विलापाप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षलतेविषयी विलाप करतो; हे हेशबोना, हे एलाले, मी आपल्या अश्रूंनी तुम्हांला न्हाऊ घालीन. कारण उन्हाळ्यातील तुझ्या फळांच्या व पिकांच्या हंगामाच्या वेळी रणशब्द कानी पडला.


म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझ्या सेवेस हजर राहण्यासाठी रेखाबाचा पुत्र योनादाब ह्याच्या घराण्यात कोणा पुरुषाची उणीव कधीच पडणार नाही.”


तथापि जे लोक लाचार असून ज्यांच्याजवळ काहीएक नव्हते अशांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यहूदा देशात राहू दिले; त्याच वेळेस त्याने त्यांना द्राक्षांचे मळे व शेते दिली.


तेव्हा ज्या ज्या ठिकाणी त्यांना हाकून दिले होते तेथून सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पा येथे गदल्याकडे आले व त्यांनी द्राक्षारस व ग्रीष्म ऋतूतील फळे ह्यांचा मोठा संचय केला.


तेव्हा यिर्मया निघून मिस्पा येथे गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे गेला व देशात जे लोक उरले होते त्यांच्यामध्ये जाऊन राहिला.


तर ज्या सर्व राष्ट्रांत त्यांना घालवले होते त्यांतून यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्या सर्वांना योहानान बिन कारेह व सर्व सेनानायक ह्यांनी आपल्याबरोबर नेले;


हे सिब्मेच्या द्राक्षलते, तुझ्यासाठी याजेरच्या आक्रोशाहून अधिक आक्रोश करीन; तुझ्या फांद्या समुद्रा-पलीकडे गेल्या होत्या, याजेर सरोवरापर्यंत त्या पोहचल्या होत्या; तुझ्या ग्रीष्मऋतूतील फळांवर व द्राक्षांच्या हंगामावर लुटारू पडला आहे.


कोण ही माझी विपत्ती! उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात, द्राक्षीच्या वेलीवर जसा सरवा राहतो, तसा मी झालो आहे; खायला द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही; माझ्या जिवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही.


तुम्ही तर होणार्‍या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.”


पण तुझ्या सेवेस हजर राहणारा नूनाचा मुलगा यहोशवा ह्याचा प्रवेश होईल. तू त्याला धीर दे; कारण तो देश इस्राएलास वतन म्हणून तो मिळवून देईल.


आपल्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पन्न गोळा केल्यावर तू मांडवांचा सण सात दिवस पाळावास;


Lean sinn:

Sanasan


Sanasan