Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 “परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजाचे व सरदारांचे काळीज ठाव सोडील; याजकांची त्रेधा उडेल आणि संदेष्टे भयचकित होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 “आणि परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजांचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे हृदय मरून जाईल, याजक घाबरतील आणि संदेष्टे भयभीत होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 याहवेह असे म्हणतात, “त्या दिवशी असे घडेल,” “राजा आणि अधिकारी भीतीने गर्भगळीत होतील, याजकांना भयाने धडकी भरेल आणि संदेष्टे भीतीने गांगरून जातील,”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:9
20 Iomraidhean Croise  

मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला.


माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे, कारण मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही.


त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.


मिसराच्या अंगची हिंमत खचेल; त्याची मसलत मी व्यर्थ करीन; ते मूर्तींना, मांत्रिकांना, भूतवैद्यांना व गारुड्यांना प्रश्‍न विचारतील.


जेव्हा जेव्हा तो येईल तेव्हा तेव्हा तो तुम्हांला ग्राशील; नित्य सकाळी, रात्री व दिवसा तो येईल; हा संदेश कळल्याने दहशत पोहचेल.


चोराला पकडले म्हणजे तो जसा लाजतो तसे इस्राएलाचे घराणे लज्जित झाले आहे; ते, त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे लज्जित झाले आहेत.


मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन.


तुमच्या ज्या संदेष्ट्यांनी भविष्य केले की, ‘बाबेलचा राजा तुमच्यावर व ह्या देशावर चाल करून येणार नाही ते कोठे आहेत?’


करीयोथ हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत; त्या दिवशी मवाबाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीच्या हृदयासारखे होईल.


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


मग नगराच्या तटास एक खिंड पाडण्यात आली; आणि दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेनजीक होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे त्यांनी अराबाचा रस्ता धरला.


‘अहो धिक्कार करणार्‍यांनो, पाहा, आश्‍चर्य करा व नाहीसे व्हा; कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणारच नाही.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan