Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 सिंह त्याच्या झाडीतून बाहेर आला आहे, आणि राष्ट्रांचा नाश करणारा निघाला आहे. जिथे कोणी राहत नाही असे, तुमच्या शहरांना भयामध्ये आणि ओसाडी मध्ये पालटायला तो आपल्या स्थानांतून निघून येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 सिंह आपल्या गुहेतून बाहेर पडला आहे; राष्ट्रांचा विनाशक आलेला आहे. त्याने आपले निवास सोडले आहे. तुमच्या भूमीला उद्ध्वस्त करण्यासाठी. तुमची नगरे उजाड होतील आणि निर्जन होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:7
33 Iomraidhean Croise  

यहोयाकीमाच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेसर ह्याने स्वारी केली; यहोयाकीम तीन वर्षे त्याचा अंकित होऊन राहिला; मग त्याने त्याच्यावर उलटून बंड केले.


त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुशलेमेवर चढाई करून आला; त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारले.


तुमचा देश ओसाड आहे; तुमची नगरे अग्नीने जळाली आहेत; तुमची शेते परके लोक तुमच्यादेखत खाऊन टाकत आहेत; परक्यांनी उद्ध्वस्त केल्याप्रमाणे ती ओसाड झाली आहेत.


सेनाधीश परमेश्वराने माझ्या कानात सांगितले : “बहुत मोठी व सुंदर घरे खरोखर ओसाड व लोकरहित होतील.


मी म्हणालो, “हे प्रभू, असे कोठवर?” तो म्हणाला, “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल,


तरुण सिंहांनी त्याच्यावर गर्जना केली आहे, त्यांनी महानाद केला आहे; त्यांनी त्याचा देश उजाड केला आहे, त्याची नगरे जाळून-पोळून निर्जन केली आहेत.


कारण यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वर म्हणतो : तू मला गिलाद, लबानोनाचे शिखर असे आहेस; मी तुला खातरीने ओसाड भूमीसारखे, निर्जन नगरासारखे करीन.


मी तुझ्याविरुद्ध विध्वंसक त्यांच्या शस्त्रांनिशी सिद्ध करीन; ते तुझे निवडक गंधसरू तोडून अग्नीत टाकतील.


तरुण सिंहाप्रमाणे त्याने आपली जाळी सोडली आहे; क्लेश देणार्‍या तलवारीने व त्याच्या क्रोधाच्या संतापाने त्यांचा देश उजाड झाला आहे.”


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


‘हे मंदिर शिलोप्रमाणे होईल व हे नगर उजाड व निर्जन होईल,’ असा संदेश तू परमेश्वराच्या नामाने का दिलास?” मग सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात यिर्मयाच्या भोवती जमले.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा जे राष्ट्र व राज्य करणार नाही आणि बाबेलच्या राजाच्या जोखडाला मान देणार नाही, अशा राष्ट्राचा त्याच्या हातून मी अंत करीपर्यंत तलवार, दुष्काळ आणि मरी ह्यांनी मी समाचार घेईन.


परमेश्वर म्हणतो, ह्या स्थलाविषयी तुम्ही म्हणता की, ‘हे ओसाड आहे, ह्यात माणसे व पशू ह्यांचा मागमूस नाही; यहूदाची नगरे व यरुशलेमेचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांत माणसे, रहिवासी व पशू ह्यांचे नाव नाही;’


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आज्ञा करून त्यांना ह्या नगराकडे परत यायला लावीन; ते त्याबरोबर लढून ते घेतील व ते अग्नीने जाळतील; मी यहूदाची नगरे ओसाड व निर्जन करीन.”


घोडेस्वारांच्या व तिरंदाजांच्या शब्दांनी सर्व शहर पळत आहे; ते झाडीत, खडकांच्या फटीत लपत आहेत; लोकांनी प्रत्येक नगर सोडले आहे, कोणी माणूस त्यात राहत नाही.


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मी यरुशलेमेवर व यहूदाच्या सर्व नगरांवर जे अरिष्ट आणले ते सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे; पाहा, आज ती उजाड व निर्जन झाली आहेत;


राजेश्वर, सेनाधीश परमेश्वर, हे ज्याचे नाम तो म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, डोंगरामध्ये जसा ताबोर व समुद्राजवळ जसा कर्मेल तसा तो निश्‍चये येईल.


पाहा, तो यार्देनेच्या घोर अरण्यामधून येणार्‍या सिंहाप्रमाणे त्या मजबूत वस्तीवर येईल; मी अदोमास त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन, व ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?


ह्यास्तव रानातला सिंह त्यांना फाडील, वनातला लांडगा त्यांना फस्त करील, चित्ता त्यांच्या नगरांजवळ दबा धरून तेथून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाचे फाडून तुकडे करील; कारण त्यांचे अपराध व त्यांची मागे घसरणी ही बहुत आहेत.


“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर.


पाहा, यार्देनेच्या घोर अरण्यातून जसा सिंह तसा तो त्या मजबूत वस्तीवर येईल; पण मी त्यांना त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन; ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?


“त्याच्या घोड्यांचे फुरफुरणे दानातील नगरांतून ऐकू येते; त्याच्या वारूंच्या मोठ्या खिंकाळण्यांनी सर्व भूमी हादरत आहे; ते येऊन देश व त्यातील सर्वस्व, नगर व त्यातील रहिवासी ह्यांना ग्रासून टाकतात.


यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.”


आबाद नगरे उजाड होतील, भूमी ओसाड होईल, म्हणजे तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.”


मी आपल्या कोपाचा वर्षाव तुझ्यावर करीन, माझ्या कोपाग्नीचा मी तुझ्यावर फुंकर घालीन आणि राक्षसी व नाश करण्यात कुशल अशा मनुष्यांच्या हाती मी तुला देईन.


“मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याविषयी विलाप कर; त्याला सांग , राष्ट्रांमध्ये तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू महानदातल्या मगरासमान आहेस; तू आपल्या नद्यांमध्ये उसळ्या मारल्यास, आपल्या पायांनी पाणी गढूळ केलेस, व त्यांच्या सर्व नद्यांची घाण केलीस.


त्याने त्याला मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भीत; वाटेल त्याला तो ठार मारी व वाटेल त्याला जिवंत राखी; वाटेल त्याला तो थोर करी व वाटेल त्याला तो नीच करी.


पहिले सिंहासारखे असून त्याला गरुडाचे पंख होते; मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले; त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले; त्याला मानवाचे हृदय दिले.


मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्रस्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही.


परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan