Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 यहूदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा, आणि म्हणा की, “देशात रणशिंग फुंका; जोराने ओरडून म्हणा, ‘एकत्र व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात जाऊ.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 “यहूदाच्या लोकांस ही वार्ता कळवा आणि यरूशलेमला हे ऐकू जाऊ द्या: ‘देशात रणशिंगे फुंका, घोषीत करा, एकत्र या. आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “यहूदीयात याची घोषणा करा आणि यरुशलेमात जाहीर करा व सांगा: ‘संपूर्ण राष्ट्रांत रणशिंगे फुंका!’ मोठ्याने ओरडून सांगा: ‘सर्वजण एकत्र या! तटबंदीच्या नगरात शरण घ्या!’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:5
16 Iomraidhean Croise  

जेव्हा जेव्हा तो येईल तेव्हा तेव्हा तो तुम्हांला ग्राशील; नित्य सकाळी, रात्री व दिवसा तो येईल; हा संदेश कळल्याने दहशत पोहचेल.


“तुम्ही ह्या कराराची वचने ऐका; यहूदाचे लोक व यरुशलेमकर ह्यांच्याशी बोला.


बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्या देशावर चालून आला तेव्हा मात्र आम्ही म्हटले, ‘खास्द्यांचे सैन्य व अराम्यांचे सैन्य ह्यांच्या भीतीस्तव चला, आपण यरुशलेमेस जाऊ.’ म्हणून आज आम्ही यरुशलेमेत राहत आहोत.”


याकोबघराण्यामध्ये हे पुकारा आणि यहूदामध्ये जाहीर करून म्हणा की,


बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.


आपण स्वस्थ का बसलो आहोत? जमा व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात शिरू व तेथे नष्ट होऊ; कारण आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे म्हणून आम्ही नाश पावावे असे परमेश्वर आमचा देव ह्याने ठरवले आहे व विषाचे पाणी आम्हांला प्यायला दिले आहे.


हे समजून घेईल असा शहाणा कोण आहे? परमेश्वराच्या मुखाने त्याला सांगितले असून ते इतरांना कळवील असा कोण आहे? देशाचा नाश का झाला? कोणी त्यातून येत नाही असा तो जळून वैराणासारखा का झाला?


ते कर्णा वाजवतात, सर्व तयारी करतात, तरी कोणी युद्धास पुढे सरसावत नाहीत; कारण त्या समूहावर माझा कोप झाला आहे.


मुखाला कर्णा लाव. गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल, कारण त्यांनी माझा करार मोडला आहे, माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी अतिक्रमण केले आहे.


सीयोनात कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा; देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण, परमेश्वराचा दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे.


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?”


“तू चांदीचे दोन कर्णे बनव; ते घडीव कामाचे असावेत; मंडळीला बोलावण्यासाठी आणि तळ उठवण्यासाठी त्यांचा तू उपयोग करावास.


हे दोन्ही कर्णे वाजवले म्हणजे सर्व मंडळीने तुझ्यासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमावे.


यहोशवा आणि इस्राएल लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले, पण त्यांच्यातले काही लोक वाचून तटबंदीच्या नगरात गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan