Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अहो यहूदातील मनुष्यांनो आणि यरूशलेममधील रहिवास्यांनो, परमेश्वरासाठी तुम्ही आपली सुंता करा व आपले हृदय परमेश्वराला समर्पण करा. नाही तर तुमच्यातील कोणालाही विझवता न येणारा माझा क्रोधाचा अग्नी बाहेर पडून तुम्हास जाळून टाकील. हे असे घडण्याचे कारण तुम्ही केलेल्या दुष्कृत्ये आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 अहो यहूदीया आणि यरुशलेम निवासियांनो याहवेहसाठी तुमची सुंता करा, तुमच्या अंतःकरणाची सुंता करा, नाहीतर माझा राग भडकेल व अग्नीसारखा भडकेल कारण तुम्ही पापे केली आहेत— तो क्रोधाग्नी कोणालाच विझविता येणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:4
36 Iomraidhean Croise  

कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडवलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे म्हणून ह्या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे; तो शांत व्हायचा नाही.


इस्राएलाची ज्योती अग्नी होईल, त्याचा जो पवित्र प्रभू तो ज्वाला होईल; एका दिवसात त्याचे काटेकुटे व काटेझुडपे तो जाळून खाक करील.


कारण पूर्वीच तोफेत (दहनस्थान) तयार केले आहे; ते राजासाठी सिद्ध केले आहे; ते खोल व रुंद केले आहे; त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत; गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवतो.


हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.


तुला ठाऊक नाही अशा देशात तुझे शत्रू ती लूट घेऊन जातील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी पेटला आहे, तुमच्याविरुद्ध पेटला आहे.”


‘परमेश्वर म्हणतो, हे दावीदघराण्या, रोज सकाळी न्यायनिवाडा कर; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडव; नाहीतर तुझ्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा संताप अग्नीसारखा भडकेल. तो कोणाच्याने विझवणार नाही.”’


राग, संताप व क्रोध ह्यांनी भरून, बाहू उभारून, बलवान महाभुजाने तुमच्याशी मी स्वत: लढेन.


पाहा, परमेश्वरापासून त्याचे क्रोधरूप तुफान सुटले आहे; गरगर फिरणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.


कदाचित ते परमेश्वरापुढे आपली विनंती सादर करतील व आपापल्या कुमार्गापासून वळतील; कारण परमेश्वराने ह्या लोकांवर क्रोध व संताप करीन म्हणून सांगितले तो भारी आहे.”


तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे ही परमेश्वराला इतःपर सहन होईनात; म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे, हे आज दिसतच आहे.


परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, सुंती, पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन;


मिसर, यहूदा, अदोम, अम्मोनी, मवाबी व आपल्या केसांची चोंच काढणारे रानातले रहिवासी ह्या सर्वांना मी शासन करीन; कारण सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत व इस्राएलाचे सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे.”


परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्याने सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत.


जारिणी व रक्तपाती स्त्रिया ह्यांचा न्याय करावा तसा मी तुझा न्याय करीन आणि क्रोधाने व ईर्ष्येने मी तुझा रक्तपात करीन.


तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या; आपल्या ठायी नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा; हे इस्राएल घराण्या, तुम्ही का मरता?


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी प्रबल बाहूने, उगारलेल्या हाताने व कोपवृष्टी करून तुमच्यावर राज्य करीन.


मीही टाळी वाजवून आपल्या क्रोधाची पूर्तता करीन; मी परमेश्वर हे म्हणतो.”


तुझी अशुद्धता पाहावी तर ती भयंकर आहे; मी तुला स्वच्छ करू पाहिले तरी तू स्वच्छ झाली नाहीस; तुझ्यावरील माझ्या संतापाची तृप्ती झाल्यावाचून तू शुद्ध व्हायची नाहीस.


संताप येऊन सूड उगवावा ह्यासाठी तिने रक्त पाडले आहे, ते झाकता येऊ नये म्हणून ते उघड्या खडकावर पडावे असे मी केले आहे.


तुम्ही मला अन्न, चरबी व रक्त अर्पण करताना मनाने व शरीरानेही बेसुंती अशा परक्या लोकांना माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. ह्याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये भर घातली आहे.


जो दूर असेल तो मरीने मरेल; जो जवळ असेल तो तलवारीने पडेल; ह्यांतूनही जो निभावेल तो दुष्काळाने मरेल; अशी मी त्यांच्यावरच्या माझ्या संतापाची परिपूर्ती करीन.


ह्यामुळे मी संतापून करायचे ते करीन, मी त्यांच्यावर कृपादृष्टी करणार नाही; त्यांची गय करणार नाही; त्यांनी मोठ्याने माझ्या कानी आरोळी मारली तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”


तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


तसेच ते माझ्याविरुद्ध चालले ह्या कारणामुळे मीही त्यांच्याविरुद्ध होऊन त्यांना शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील, आणि त्यांचे अशुद्ध2 ह्रदय लीन होऊन ते आपल्या दुष्टतेचा दंड मान्य करतील.


परमेश्वरास शरण जा, म्हणजे वाचाल; नाहीतर तो योसेफाच्या घराण्यावर अग्नीसारखा पडून त्याला खाऊन टाकील; त्याला विझवणारा बेथेलात कोणी असणार नाही.


निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्वराचा क्रोधदिन तुमच्यावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या.


कारण जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास तर सुंतेचा उपयोग आहे खरा; परंतु जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे.


म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका.


तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुंता करील, आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रेम करशील.


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


त्याच्या ठायी तुमची सुंताही झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव1 झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुंतेच्या द्वारे तुमची सुंता झाली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan