Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 घोडेस्वारांच्या व तिरंदाजांच्या शब्दांनी सर्व शहर पळत आहे; ते झाडीत, खडकांच्या फटीत लपत आहेत; लोकांनी प्रत्येक नगर सोडले आहे, कोणी माणूस त्यात राहत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 प्रत्येक शहर स्वर व धनुर्धारी यांच्या आवाजाने पळून जातील, ते जंगलात पळून जातील. प्रत्येक शहर डोंगरकड्याच्या ठिकाणी चढेल. शहरे ओसाड पडतील, कारण तेथे कोणीही राहणारे नसतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 घोडेस्वार आणि धनुष्यधारी यांची वाणी ऐकताच आवाजाने सर्व नगरे घाबरून पळतात. काही लोक झुडूपात लपून बसतात; आणि डोंगरा-पर्वतांवर चढतात. सर्व नगरे उजाड पडली आहेत; कोणीही त्यात राहत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:29
14 Iomraidhean Croise  

ह्यास्तव परमेश्वराने त्यांच्यावर अश्शूरच्या राजाचे सेनानायक पाठवले. त्यांनी मनश्शेस आकड्यांनी पकडून व बेड्या घालून बाबेलास नेले.


एकाच्या धमकीने तुमचे हजार पळतील, पाचांच्या धमकीने तुम्ही पळाल; डोंगरमाथ्यावरील एखाद्या ध्वजस्तंभा-सारखे, टेकडीवरील ध्वजेसारखे तुम्हीच तेवढे शेष उराल.


परमेश्वर लोकांना दूर घालवून देईल व देशात ओसाड स्थळे बहुत होतील तोवर.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी पुष्कळ पाग टाकणार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते त्यांना पाग टाकून पकडतील; नंतर मी पुष्कळ शिकार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून व खडकांच्या कपारींतून त्यांना हुसकून काढून त्यांची शिकार करतील.


सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;


मग नगराच्या तटास एक खिंड पाडण्यात आली; आणि दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेनजीक होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे त्यांनी अराबाचा रस्ता धरला.


ते लोक धनुष्ये व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात; ते घोड्यांवर स्वार झाले आहेत; हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझ्याविरुद्ध एकजुटीने येत आहेत.”


मी प्रभूला वेदीजवळ उभे राहिलेले पाहिले; तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यांवर प्रहार कर म्हणजे उंबरठे हलतील; त्यांचे तुकडे करून त्या सर्वांच्या डोक्यावर पाड; त्यांच्यातले शेष उरतील ते मी तलवारीने वधीन; त्यांतला कोणी पळून जाऊ पाहील, पण त्याला पळून जाता येणार नाही; त्यांतला कोणी निसटून जाऊ पाहील, पण तो निभावणार नाही.


त्या समयी ते ‘पर्वतांना म्हणू लागतील, आमच्यावर पडा, व टेकड्यांना म्हणतील, आम्हांला झाका.’


आपण पेचात सापडलो आहोत असे इस्राएल लोकांनी पाहिले, (खरोखरच त्या लोकांना संकट प्राप्त झाले होते,) तेव्हा ते गुहा, झुडपे, खडक, दुर्ग व विवरे ह्यांत लपले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan