Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 ह्यामुळे पृथ्वी शोक करील, वर आकाश काळे होईल; कारण मी असे बोललो आहे, मी हे योजले आहे; मी अनुताप पावणार नाही; मी माघार घेणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 या कारणामुळे भूमी शोक करणार आणि वर आकाशे काळोख होतील. कारण मी माझे बेत घोषीत केले आहेत, मी त्यापासून माघार फिरणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 यास्तव पृथ्वी शोक करेल आणि आकाशात काळोख होईल, कारण मी बोललो आहे, त्यात आता बदल होणार नाही, मी निर्णय घेतला आहे आणि मागे फिरणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:28
34 Iomraidhean Croise  

पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे; जग झुरून कृश झाले आहे; पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत.


आकाशातील सर्व सेना गळून पडेल, आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल; द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल.


त्या दिवशी समुद्रगर्जनेप्रमाणे ते त्यांच्यावर गर्जना करतील; भूमीकडे पाहावे तर अंधकार व संकट; तेथील अभ्रांमुळे प्रकाश जाऊन काळोख होईल.


मी आकाशास काळा पेहराव लेववतो; गोणपाट त्याचे पांघरूण करतो.”


त्यांनी ते ओसाड केले आहे; ते ओसाड होऊन माझ्यापुढे विलाप करीत आहे; सगळा देश ओसाड झाला आहे, कारण कोणालाही त्याची पर्वा वाटली नाही.


देशाने कोठवर शोक करावा? सर्व देशातली वनस्पती कोठवर सुकणार? त्यात वस्ती करणार्‍यांच्या दुष्टतेने पशुपक्षी नष्ट झाले आहेत, कारण ते म्हणतात, “आमचा अंत तो पाहणार नाही.”


“यहूदा शोक करीत आहे, त्याच्या वेशी उदासवाण्या झाल्या आहेत; ते भूमीवर शोक करीत पडले आहेत; यरुशलेमेची आरोळी वर गेली आहे.


कारण जारकर्म्यांनी देश व्यापला आहे; शापामुळे भूमी शोक करीत आहे; रानातील कुरणे वाळली आहेत; लोकांची गती वाईट आहे, त्यांचा पराक्रम म्हटला तर अधर्म;


परमेश्वर आपले कार्य करीपर्यंत, आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत, त्याचा संताप मागे फिरणार नाही; पुढील काळात तुम्हांला हे चांगले समजेल.


परमेश्वर आपले कार्य संपवीपर्यंत व आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत त्याचा संतप्त क्रोध मागे फिरणार नाही; हे पुढील काळात तुम्हांला समजेल.”


बाबेलच्या कोटांसमोर ध्वज उभारा; पहारा मजबूत करा, पहारेकरी ठेवा; छापा घालण्याची तयारी करा; कारण परमेश्वर बाबेलच्या रहिवाशांविरुद्ध जे बोलला त्याची योजना करून ते त्याने सिद्धीसही नेले आहे.


ह्याकरता तू ह्या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, आरोळी व विनंती करू नकोस, माझ्याजवळ मध्यस्थी करू नकोस; कारण मी ऐकणार नाही.


परमेश्वराने योजल्याप्रमाणे केले आहे; त्याने प्राचीन काळापासून दिलेली ताकीद अंमलात आणली आहे; त्याने मोडतोड केली, गय केली नाही; त्याने शत्रूस तुझ्यावर हर्षवले आहे, त्याने तुझ्या वैर्‍यांचा उत्कर्ष केला आहे.


मी परमेश्वर हे बोललो आहे; हे घडेलच, हे मी करीनच; मी मागे हटणार नाही, गय करणार नाही, ह्याचा मला अनुताप होणार नाही; तुझ्या आचारांनुसार, तुझ्या कर्मांनुसार, ते तुझा न्याय करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना उद्धरीन काय? मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन काय? अरे मृत्यू, तुझ्या महामार्‍या कोठे आहेत? अरे अधोलोका, तुझ्याकडून होणारा विनाश कोठे आहे? माझ्या दृष्टीपासून कळवळा लपला आहे.


ह्यामुळे देश शोक करीत आहे व त्यातील सर्व रहिवासी व त्यांच्याबरोबर वनपशू व आकाशातील पक्षी म्लान झाले आहेत; समुद्रातले मासेही नाहीतसे झाले आहेत.


शेताचे रान झाले आहे; भूमी रुदन करत आहे, कारण पिकाचा नाश झाला आहे; नवा द्राक्षारस आटला आहे; तेल क्षय पावले आहे.


कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला, तेव्हा तुमचे अनिष्ट करण्याचे मी योजले ह्याविषयी मला अनुताप झाला नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो;


“बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?


मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.


सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.


आता सुमारे दोन प्रहर झाले, आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तिसर्‍या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला;


आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत;


ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले;


(ते तर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण ज्याने त्याच्याविषयी [मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे] “‘तू युगानुयुग याजक आहेस’ अशी शपथ परमेश्वराने वाहिली आणि ती तो बदलणार नाही,” असे सांगितले त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला),


त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’सारखा झाला;


जो इस्राएलाचे केवळ वैभव आहे, तो खोटे बोलणार नाही; तो पस्तावा करणार नाही, त्याला पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan