Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मी पर्वतांकडे पाहिले तर ते कापत आहेत; सर्व डोंगर डळमळत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मी डोंगराकडे पाहिले आणि पाहा! ते कापत होते व सर्व टेकड्या थरथरत होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 मी पर्वतांकडे पाहिले, ते कंपायमान झालेले होते; सर्व डोंगर डळमळत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:24
19 Iomraidhean Croise  

त्याने त्याला म्हटले, “तू येथून बाहेर निघून जा; पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा.” तेव्हा पाहा, परमेश्वर जवळून जात असताना त्याच्यासमोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारत व खडक फोडत होता; पण त्या वार्‍यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला; पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता.


तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, पर्वताचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता.


तुझ्या गर्जनेचा शब्द झंझावातात होता; विजांचा पृथ्वीवर लखलखाट झाला; भूमी कंपित होऊन डळमळली.


त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; ते पाहून पृथ्वी कंपायमान झाली.


सर्व सीनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला.


मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल; सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यांमुळे असे होईल.


भूमी मद्यप्यासारखी झोकांड्या खात आहे, माचाळासारखी झुलत आहे; तिच्या अपराधांचा भार तिला दाबत आहे; ती पडेल, आणि पुन्हा उठणार नाही.


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


“त्याच्या घोड्यांचे फुरफुरणे दानातील नगरांतून ऐकू येते; त्याच्या वारूंच्या मोठ्या खिंकाळण्यांनी सर्व भूमी हादरत आहे; ते येऊन देश व त्यातील सर्वस्व, नगर व त्यातील रहिवासी ह्यांना ग्रासून टाकतात.


मी पर्वतांविषयी आक्रंदन करीन, विलाप करीन, रानातल्या कुरणांबद्दल शोक करीन; कारण ती जळून खाक झाली आहेत; त्यांवरून कोणी चालत नाहीत; तेथे कोणाला गुराढोरांचा शब्द ऐकू येत नाही; जनावरे पळाली आहेत, आकाशातील पक्षी निघून गेले आहेत.


समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, वनातले पशू, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी व भूमीवर राहणारी सर्व माणसे माझ्यापुढे थरथर कापतील; पर्वत नष्ट होतील, कडे खचतील, हरएक कोट कोसळून जमीनदोस्त होईल.


अग्नीपुढे मेण वितळते अथवा उतरणीवर ओतलेले पाणी वाहते, तसे पर्वत त्याच्या खाली विरघळतात व खोरी फाटतात.


पर्वत तुला पाहून विव्हळतात; जलप्रवाह सपाट्याने चालला आहे, डोह आपला शब्द उच्चारतो, आपले हात वर करतो.


तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते; तो नजर टाकून राष्ट्रांना उधळून लावतो. सर्वकाळचे पर्वत विदीर्ण होतात, युगानुयुगीचे डोंगर ढासळतात, त्याचा हा पूर्वकाळापासून प्रघात आहे.


‘एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश’ गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून ढळली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan