Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मी ध्वजा कोठवर पाहू? कर्ण्याचा शब्द कोठवर ऐकू?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 युद्धाचा झेंडा मी किती काळ पाहू? काय मला रणशिंग्याचा आवाज ऐकायला मिळेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 किती काळ मी युद्धाचा ध्वज पाहणार आहे आणि केव्हापर्यंत रणशिंगाचा आवाज ऐकत राहणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:21
11 Iomraidhean Croise  

यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ विलापगीत रचले; सर्व गाणारे व गाणार्‍या आपल्या विलापगीतात योशीयाचे वर्णन आजवर करीत आहेत; त्यांची ही गीते इस्राएल लोकांत निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला, आणि ती विलापगीतांत नमूद केली आहेत.


वर्षारंभी नबुखद्नेस्सराने सैन्य पाठवून तो व त्याच्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरातली मोलवान पात्रे ही बाबेलास आणली आणि त्याचा भाऊ सिद्कीया ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले.


त्याने त्यांच्यावर खास्द्यांच्या राजाची स्वारी आणली; त्याने त्यांच्या तरुण पुरुषांना त्यांच्याच पवित्रस्थानाच्या घरात तलवारीने वधले; त्याने तरुणांवर व कुमारींवर, वृद्धांवर किंवा वयातीतांवर दया केली नाही; परमेश्वराने सर्वांना त्याच्या हाती दिले.


मिसराच्या राजाने यरुशलेमेत येऊन त्याला पदच्युत केले व देशावर त्याने शंभर किक्कार रुपे व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली.


माझी आतडी तुटतात हो तुटतात! माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत! माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे! माझ्याने स्तब्ध राहवत नाही! कारण माझ्या जिवा, कर्ण्याचा नाद, रणशब्द तू ऐकला आहेस.


नाशावर नाश पुकारला आहे; कारण सर्व देश लुटला आहे; माझे डेरे अकस्मात माझ्या कनाती क्षणात लुटल्या आहेत.


“कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत; ती निर्बुद्ध, असमंजस अशी मुले आहेत; वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यांना ज्ञान नाही.”


आणि असे म्हणाल की, ‘नाही, आम्ही मिसर देशात जाऊ, तेथे आमच्या नजरेस युद्ध पडणार नाही, तेथे कर्ण्याचा शब्द आम्हांला ऐकू येणार नाही व भाकरीवाचून आम्ही उपाशी मरणार नाही, आम्ही तेथेच वस्ती करू;’


बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan