Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 माझी आतडी तुटतात हो तुटतात! माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत! माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे! माझ्याने स्तब्ध राहवत नाही! कारण माझ्या जिवा, कर्ण्याचा नाद, रणशब्द तू ऐकला आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 माझे हृदय! माझे हृदय! मी माझ्या हृदयात दु:खी आहे. माझ्याठायी माझे हृदय अनावर झाले आहे. माझ्याने शांत बसवत नाही, कारण हे माझ्या जीवा तू रणशिंग्याचा आवाज, लढाईची ओरड ऐकली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 अहो, माझ्या यातना, माझ्या यातना! मला अत्यंत वेदना होत आहेत. अहो, माझ्या ह्रदयाच्या यातना! माझे ह्रदय माझ्यातच धडधडते, मी शांत राहू शकत नाही. कारण मी रणशिंगाचा आवाज ऐकला आहे; मी युद्धाची ललकारी ऐकली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:19
48 Iomraidhean Croise  

माझ्या जिवा, त्यांच्या मसलतीत शिरू नको; माझ्या शीला, त्यांच्या मंडळात सामील होऊ नको; कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला; त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या.


तो आपल्या बापाला म्हणाला, “अरेरे! माझे डोके! माझे डोके!” त्याने आपल्या चाकराला सांगितले, “ह्याला त्याच्या आईकडे उचलून ने.”


तो त्याच्याकडे एकसारखा टक लावून पाहू लागला. त्याने इतकी टक लावली की तो भांबावून गेला; आणि देवाचा माणूस रडू लागला.


हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.


हे माझ्या जिवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.


लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात.


दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात, म्हणून मला फार संताप येतो.


परमेशाचे स्तवन करा!1 हे माझ्या जिवा, परमेश्वराचे स्तवन कर.


मी परमेश्वराला म्हटले, “तूच माझा प्रभू आहेस, तुझ्यापरते मला सुख नाही.”


माझे हृदय मवाबाविषयी आक्रोश करीत आहे; त्याचे सरदार सोअर नगर, एग्लाथ-शलिशिया येथवर पळून गेले आहेत;1 लूहीथ चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाइमाच्या वाटेवर नाश झाल्याची आरोळी ते करीत आहेत.


ह्यामुळे माझी आतडी मवाबासाठी, माझे काळीज कीर-हरेसासाठी वीणेप्रमाणे नाद करीत आहे.


हे पाहून माझ्या कंबरेस कळा लागल्या आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदना होत आहेत; मी एवढे आळेपिळे देत आहे की मला ऐकू येत नाही; मी इतका घाबरलो आहे की मला दिसत नाही.


माझे हृदय धडधडते; भीतीने मी त्रस्त झालो आहे; माझी आवडती वेळ संध्याकाळ मला कंपित करणारी झाली आहे.


ह्यासाठी मी म्हणालो, “माझ्यावरून आपली दृष्टी फिरवा; मी मनस्वी रडणार आहे; माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे; त्याबद्दल माझे सांत्वन करण्याचे श्रम घेऊ नका.”


पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकान्ती शोकाकुल होईल; परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळतील.


मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.


संदेष्ट्यांविषयी : माझे हृदय माझ्या ठायी भग्न झाले आहे; माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत; परमेश्वर व त्याची पवित्र वचने ह्यांमुळे मी मद्यप्यासारखा, द्राक्षारसाने मस्त झालेल्या मनुष्यासारखा झालो आहे.


मी ध्वजा कोठवर पाहू? कर्ण्याचा शब्द कोठवर ऐकू?


यहूदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा, आणि म्हणा की, “देशात रणशिंग फुंका; जोराने ओरडून म्हणा, ‘एकत्र व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात जाऊ.’


आणि असे म्हणाल की, ‘नाही, आम्ही मिसर देशात जाऊ, तेथे आमच्या नजरेस युद्ध पडणार नाही, तेथे कर्ण्याचा शब्द आम्हांला ऐकू येणार नाही व भाकरीवाचून आम्ही उपाशी मरणार नाही, आम्ही तेथेच वस्ती करू;’


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत अम्मोन्यांचा राब्बा नगराविरुद्ध मी रणशब्द ऐकायला लावीन; ते नासाडीचा ढिगार होईल, तिच्या कन्यांना अग्नीने जाळतील; इस्राएल आपले वारस झालेल्यांचा वारस होईल, असे परमेश्वर म्हणतो.


देशात युद्धध्वनी होत आहे, मोठा नाश होत आहे.


आम्ही त्यांचा लौकिक ऐकला आहे, आमचे हात गळून गेले आहेत; आम्हांला क्लेश झाला आहे. प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे वेणा लागल्या आहेत.


हायहाय! माझ्या दुःखाचे सांत्वन मला करता आले असते तर बरे होते! माझे हृदय माझ्या ठायी म्लान झाले आहे.


माझ्या लोकांच्या कन्येच्या घायाने मी घायाळ झालो आहे, मी सुतकी आहे; महाभयाने मला घेरले आहे.


अहाहा! माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते! म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येच्या वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता.


मी पर्वतांविषयी आक्रंदन करीन, विलाप करीन, रानातल्या कुरणांबद्दल शोक करीन; कारण ती जळून खाक झाली आहेत; त्यांवरून कोणी चालत नाहीत; तेथे कोणाला गुराढोरांचा शब्द ऐकू येत नाही; जनावरे पळाली आहेत, आकाशातील पक्षी निघून गेले आहेत.


ह्या सर्वांमुळे मी रडत आहे; माझा डोळा, माझा डोळा अश्रू ढाळत आहे; कारण माझ्या जिवाचे समाधान व सांत्वन करणारा मला अंतरला आहे; माझी मुले नष्ट झाली आहेत, कारण शत्रू प्रबल झाला आहे.”


हे परमेश्वरा, पाहा, मी किती संकटात आहे! माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे; माझ्या मनाची खळबळ झाली आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर पाहावे तर तलवार मला निर्वंश करते, आत पाहावे तर मृत्यू आहे.


माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत, माझ्या आतड्यांना पीळ पडत आहेत; माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे; कारण बालके व तान्ही नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन पडली आहेत.


मग बेल्टशस्सर हे नाव दिलेला दानीएल क्षणभर बुचकळ्यात पडला व विचारांनी त्याचे मन व्यग्र झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, “बेल्टशस्सरा, ह्या स्वप्नासंबंधाने व त्याच्या अर्थासंबंधाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बेल्टशस्सराने म्हटले, “माझे स्वामी, हे स्वप्न आपल्या द्वेष्ट्यांना व त्याचा अर्थ आपल्या वैर्‍यांना लागू पडो!


मग मी दानीएल तर असा झालो की, माझ्या ठायी माझा जीव घाबरा झाला; माझ्या डोक्यात घोळणार्‍या दृष्टान्तांमुळे मी चिंताक्रांत झालो.


ह्या गोष्टींचे कथन येथे संपले. मी दानीएल ह्या कल्पनांनी व्याकूळ झालो, आणि माझी चर्या पालटली; तरी मी हे सर्व आपल्या मनात ठेवले.


मग मी दानीएल मूर्च्छित झालो व काही दिवस आजारी पडलो; त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो. हा दृष्टान्त पाहून मी विस्मित झालो; पण तो कोणास कळला नाही.


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.


तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणार्‍या शत्रूंशी तुम्ही लढायला निघाल तेव्हा तुम्ही कर्ण्यांचा मोठा गजर करा; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल.


बंधुजनहो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की, त्यांचे तारण व्हावे.


तसेच कर्णा अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील?


माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसूतिवेदना होत आहेत.


कीशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जिवा, हिंमत धरून पुढे चाल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan