Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, ‘तुमचे कुशल होईल’ असे म्हणून तू ह्या लोकांना व यरुशलेमेस खरोखर फारच चढवले आहेस; इकडे तर तलवार जिवाला जाऊन भिडली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू तू यहूदातील आणि यरूशलेममधील लोकांस खरोखरच युक्तीने फसविलेस. ‘तू त्यांना म्हणालास की तुम्हास शांती मिळेल.’ तलवार तर जिवापर्यंत पोचली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यावर मी म्हटले, “परंतु हे सार्वभौम याहवेह! तुम्ही यरुशलेमातील लोकांची पूर्णपणे दिशाभूल केली आहे, असे म्हणून ‘तुम्हाला शांती लाभेल,’ पण आम्हाला जिवे मारण्यासाठी तलवार गळ्यावर उगारली आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:10
21 Iomraidhean Croise  

मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, “प्रभू, तू ह्या लोकांचे का वाईट केले आहे? मला तू त्यांच्याकडे पाठवले ते काय म्हणून?


नाहीतर ह्या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवतो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल.


ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा;


आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा बचाव होईल असे मी ह्याचे रक्षण करीन.”


हे परमेश्वरा, आम्हांला तुझ्या ह्या मार्गातून का बहकू देतोस? आम्ही तुझे भय बाळगू नये इतकी आमची मने कठोर का करतोस? तुझे सेवक, तुझे वतन झालेले वंश ह्याच्याकरिता परत ये.


तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.”


मला तुच्छ मानणार्‍यांना ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर बोलला आहे : तुम्हांला शांती प्राप्त होईल;’ आपल्या अंत:करणाच्या हट्टाप्रमाणे चालणार्‍या सर्वांस ते म्हणतात की, ‘तुमच्यावर काही अरिष्ट येणार नाही.’


‘अहा प्रभू परमेश्वरा! पाहा, तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली; तुला अवघड असे काही नाही.


तुझे वर्तन व तुझी कर्मे ह्यांमुळे तुला हा प्रसंग प्राप्त झाला आहे. ही तुझी दुष्टता आहे, ती खरोखर क्लेशदायी आहे; तुझ्या हृदयास ती भिडली आहे.”


ते परमेश्वराला अवमानून म्हणतात, ‘तो नाहीच; आमच्यावर अरिष्ट म्हणून येणार नाही, आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.


शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात.


शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचा घाय ते वरवर बरा करतात.


तरुण व वृद्ध रस्त्यांत जमिनीवर पडले आहेत; माझ्या कुमारी व माझे तरुण तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधदिनी त्यांचा वध केला आहे; तू त्यांना वधले, गय केली नाहीस.


मी हा संदेश देत असता असे झाले की पलट्या बिन बनाया मेला; तेव्हा मी उपडा पडून मोठ्याने ओरडून म्हणालो, “अहा प्रभू परमेश्वरा, तू इस्राएली अवशेषाचा पुरा अंत करतोस काय?”


ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनांत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले; असे की, त्यांच्या देहांची त्यांच्यात्यांच्यातच विटंबना व्हावी.


ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले.


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan