Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 “परमेश्वर म्हणतो, हे इस्राएले, जर तू माझ्याकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्यासमोरून दूर करशील, बहकणार नाहीस,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर असे म्हणतो, “हे इस्राएल जर तू परत येशील, माझ्याकडे परत वळशील. तू आपले तिरस्करणीय गोष्टी माझ्यासमोर दूर करशील आणि जर तू भटकणार नाहीस,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह म्हणतात, “हे इस्राएला, जर तू परत फिरशील,” “मग माझ्याकडे परत ये.” “जर तू आपल्या अमंगळ मूर्ती पूर्णपणे माझ्या दृष्टीसमोरून दूर करशील आणि तू कधीही पथभ्रष्ट होणार नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:1
38 Iomraidhean Croise  

मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या-बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वत:ला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला.


आणि इस्राएलाचा राजा शलमोन ह्याने यरुशलेमेच्या पूर्वेस आणि विध्वंसगिरी नावाच्या पहाडाच्या दक्षिणेस सीदोन्यांची अमंगळ देवी अष्टोरेथ, मवाबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम ह्यांच्याप्रीत्यर्थ जी उच्च स्थाने बांधली होती ती राजाने भ्रष्ट केली.


ह्याखेरीज हिल्कीया याजक ह्याला परमेश्वराच्या मंदिरात जो ग्रंथ सापडला होता त्यातील नियमशास्त्राची वचने स्थापित करावीत म्हणून यहूदा देशात व यरुशलेमेत दैवज्ञ व चेटकी आणि कुलदेवता, मूर्ती आदिकरून ज्या अमंगळ वस्तू योशीयाच्या नजरेस पडल्या त्या त्याने काढून टाकल्या.


आसाने ही वचने व ओदेद संदेष्ट्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्याला धीर आला व त्याने यहूदा व बन्यामीन ह्यांच्या सर्व प्रदेशातून आणि एफ्राइमाच्या डोंगरवटीतील जी नगरे त्याने घेतली होती त्यांतून सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि परमेश्वराची जी वेदी परमेश्वराच्या देवडीपुढे होती तिचा जीर्णोद्धार केला.


मी त्यांना ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे ह्याने त्यांना जे नियमशास्त्र विदित केले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील तर जो देश इस्राएल लोकांच्या पूर्वजांना दिला आहे तेथून ते भटकतील असे मी करणार नाही.”


इस्राएल लोक ज्या सर्व प्रदेशांत होते तेथून योशीयाने सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि जितके इस्राएल त्यांना मिळाले तितक्या सर्वांना त्याने त्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला लावले, त्याच्या सर्व कारकिर्दीत त्यांनी आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याला अनुसरायचे सोडले नाही.


इस्राएल वंशजांनो, ज्याच्याशी तुम्ही फितुरी केली आहे त्याच्याकडे वळा.


ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो “तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन; तू हीणकसापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझ्याकडे परत येतील, पण तू त्यांच्याकडे जाणार नाहीस.


यहूदाचा राजा हिज्कीया ह्याचा पुत्र मनश्शे ह्याने यरुशलेमेत जे काही केले त्यामुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन.


तर आता यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्यांना जाऊन सांग : ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुमच्यावर अनर्थ योजत आहे, तुमच्याविरुद्ध मनसुबा योजत आहे; तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा.’


पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप ह्यांचे विषय होतील.


ते म्हणाले, ‘तुम्ही सगळे आपल्या कुमार्गांपासून, आपल्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरा, म्हणजे परमेश्वराने तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना जो देश युगानुयुग दिला आहे त्यात तुम्ही राहाल;


परमेश्वर म्हणतो, कोणी आपली बायको टाकली व ती त्याच्यापासून निघून जाऊन दुसर्‍याची झाली तर तो पुन्हा तिच्याकडे परत जाईल काय? अशाने देश भ्रष्ट होणार नाही काय? तू तर अनेक जारांशी व्यभिचार केला तरी तू माझ्याकडे पुन्हा फिरू पाहतेस काय? असे परमेश्वर म्हणतो.


जा, उत्तरेकडे हे पुकारून सांग की, ‘हे मार्ग सोडून जाणार्‍या इस्राएले, मागे फीर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुझ्याकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे; मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही; असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, मुलांनो मागे फिरा; कारण मी लग्नाचा नवरा आहे; मी तुम्हांला ह्या शहरातून एक, त्या कुळांतून दोघे, असे घेऊन सीयोनेस आणीन.


“अहो मला सोडून जाणार्‍या मुलांनो, मागे फिरा, मी तुम्हांला वाटेवर आणीन.” पाहा, आम्ही तुझ्याकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहेस.


मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.


न जाणो यहूदाच्या घराण्यावर जे सर्व अरिष्ट आणण्याचा माझा बेत आहे ते ऐकून ते सर्व आपापल्या कुमार्गापासून वळतील आणि मी त्यांच्या दुष्कर्माची व त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करीन.”


यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”


सेनाधीश परमेश्वर; इस्राएलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे ह्या स्थळी मी तुमची वस्ती करवीन.


जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसामाणसांत खरा न्याय कराल,


तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजांना मी युगानुयुग दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन.


ते येथे येतील आणि येथल्या सर्व तिरस्करणीय व अमंगळ वस्तू येथून काढून टाकतील.


वाढीदिढी केली, व्याज घेतले, तर असला मनुष्य वाचेल काय? तो वाचायचा नाही; त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत; तो खातरीने मरेल; त्याने केलेला रक्तपात त्याच्यावरच उलटेल.


आता त्यांनी आपला व्यभिचार व त्यांच्या राजांनी स्थापलेल्या प्रेतवत मूर्ती माझ्यापासून दूर घालवाव्यात, मग मी त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहीन.


हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.


“तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो;


ते परत येतात, पण परात्पराकडे नव्हे; ते फसवणार्‍या धनुष्यासारखे झाले आहेत; त्यांचे सरदार आपल्या जिव्हेच्या उद्दामपणामुळे तलवारीने पडतील; ह्यामुळे त्यांची मिसर देशात अप्रतिष्ठा होईल.


“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”


तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका; त्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी पुकारून सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गांपासून व आपल्या दुष्कर्मांपासून परावृत्त व्हा; पण त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो.


‘जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील;


तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.


मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला.


तेव्हा शमुवेलाने अवघ्या इस्राएल घराण्याला सांगितले, “तुम्ही मनःपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोथ ह्यांना दूर करा, आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan