Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 39:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मी खातरीने तुझा बचाव करीन; तू तलवारीने पडणार नाहीस, तू जिवानिशी सुटशील; कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे परमेश्वर म्हणतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण मी तुला खात्रीने वाचवीन. तू तलवारीने पडणार नाहीस. तुझा जीव तुला लूट असा होईल, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मी तुला वाचवेन; तलवारीने तुझा वध होणार नाही, पण मी तुझा जीव वाचवेन, कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे याहवेह जाहीर करतात.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 39:18
19 Iomraidhean Croise  

त्यांच्याशी लढण्यास त्यांना कुमक मिळून त्यांनी हगरी व त्यांच्याबरोबरचे इतर लोक ह्यांना पादाक्रांत केले, कारण युद्धसमयी त्यांनी देवाचा धावा केला; त्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांची प्रार्थना ऐकली.


दुष्काळात मृत्यूपासून, युद्धात तलवारीच्या धारेपासून तो तुझा बचाव करील.


जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो.


पुत्राने2 रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.


पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात,


परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.


परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल;


हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य!


तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही;


ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो.


ह्या नगरात जो राहील तो तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल; जो बाहेर जाऊन तुम्हांला वेढा घालणार्‍या खास्द्यांना मिळेल तो जगेल, जिवानिशी सुटेल.


“परमेश्वर म्हणतो, जो ह्या नगरात राहील तो तलवारीने, दुष्काळाने व मरीने मरेल; पण जो खास्द्यांकडे जाईल तो जगेल, तो जिवानिशी सुटेल.


कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल.


ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी.


तुम्ही त्याच्या द्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात; त्या देवानेच त्याला मेलेल्यांतून उठवून त्याचा गौरव केला, ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan