Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 39:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 “जा, एबद-मलेख कूशी ह्याला सांग की, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी आपल्या वचनाप्रमाणे ह्या नगराचे हित नव्हे तर अहित होईल असे करीन; त्या दिवशी तुझ्यादेखत ती वचने पूर्ण होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 एबद-मलेख कूशीशी बोल आणि सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतोः पाहा, मी माझी वचने या नगराविरूद्ध अरिष्टासाठी आणील आणि चांगल्यासाठी नाही. त्या दिवशी त्या सर्व तुझ्यासमक्ष खऱ्या होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “जा आणि कूशी एबेद-मेलेखला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी या शहराविरुद्ध दिलेली माझी वचने पूर्ण करण्याची वेळ आली आहे—समृद्धी नव्हे तर विध्वंस. तुझ्या डोळ्यादेखत मी ते पूर्ण करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 39:16
24 Iomraidhean Croise  

परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाने प्रकट केलेले वचन पुरे होऊन देशास शांततेचा3 काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले; देश ओस पडला होता तोवर म्हणजे सत्तर वर्षे पुरी होईपर्यंत त्यात शांतता नांदत होती.


माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत; माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत.


एवढे मात्र पक्के समजा की, तुम्ही मला जिवे माराल तर तुम्ही आपणांवर, ह्या नगरावर व ह्यातील रहिवाशांवर निर्दोष रक्त पाडल्याचा दोष आणाल; कारण वास्तविक ही सर्व वचने तुमच्या कानी पडावीत म्हणून परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे.”


“यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या दिवसांत मीखा1 मोरष्टकर ह्याने संदेश दिला; तो यहूदाच्या सर्व लोकांना म्हणाला, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम ढिगार होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.’


परमेश्वराच्या नामाने संदेश सांगणारा असाच आणखी एक मनुष्य होता, त्याचे नाव उरीया; हा किर्याथ-यारीमकर शमायाचा पुत्र; यिर्मयाने सांगितलेल्या सर्व वचनांप्रमाणेच त्याने ह्या नगराविरुद्ध व ह्या देशाविरुद्ध संदेश दिला.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आज्ञा करून त्यांना ह्या नगराकडे परत यायला लावीन; ते त्याबरोबर लढून ते घेतील व ते अग्नीने जाळतील; मी यहूदाची नगरे ओसाड व निर्जन करीन.”


ह्यास्तव परमेश्वर सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी यहूदा व सर्व यरुशलेमकर ह्यांच्यावर जे सर्व अरिष्ट आणीन म्हणून बोललो ते आणीन; कारण मी त्यांच्याबरोबर बोललो असता त्यांनी ते ऐकले नाही, मी त्यांना हाक मारली असता त्यांनी उत्तर दिले नाही.”


मी त्याला, त्याच्या संततीला व त्याच्या सेवकांना त्यांच्या दुष्कर्माबद्दल शिक्षा करीन आणि ते, यरुशलेमनिवासी व यहूदाचे लोक ह्यांच्यावर जे अरिष्ट आणीन म्हणून मी बोललो ते सर्व त्यांच्यावर आणीन, पण त्यांनी माझे ऐकले नाही.”’


परमेश्वराने ते आणले व आपल्या म्हणण्याप्रमाणे केले. तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले व त्याची वाणी मानली नाही म्हणून हे तुमच्यावर आले.


पाहा, त्यांचे अभीष्ट नव्हे तर अनिष्ट व्हावे म्हणून मी त्यांच्यावर नजर ठेवीन; आणि मिसर देशात असलेल्या यहूदातल्या सर्व लोकांचा अंत होईपर्यंत ते दुष्काळाने व तलवारीने क्षय पावतील.


ह्यामुळे परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “तुम्ही असे बोलता म्हणून पाहा, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक सरपण असे करीन आणि तो त्यांना खाऊन टाकील.


त्याने आमच्यावर मोठे अरिष्ट आणले; जी वचने तो आमच्याविरुद्ध व आमचा न्याय करणार्‍या न्यायधीशांविरुद्ध बोलला ती त्याने प्रत्ययास आणून दिली आहेत; यरुशलेमेवर जशी विपत्ती आली तशी सर्व जगावर कधी आली नाही.


आणि ते शत्रूंपुढे पाडाव होऊन गेले असले, तरी तेथे मी तलवारीला आज्ञा करीन म्हणजे ती त्यांना वधील; मी त्यांच्याकडे दृष्टी लावीन, ती त्यांच्या वाइटासाठी असेल, बर्‍यासाठी नव्हे.”


असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे ह्यांना जी वचने व नियम मी आज्ञापले होते त्यांनी तुमच्या पूर्वजांना गाठले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे ह्यांप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे.”


आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan