Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 39:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ह्यांनी माणसे पाठवून यिर्मयाला पहारेकर्‍यांच्या चौकातून काढले व घरी न्यावे म्हणून त्याला गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या स्वाधीन केले; मग तो लोकांत जाऊन राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्यांच्या मनुष्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणातून काढले आणि शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याने त्यास घरी न्यावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले. मग यिर्मया लोकांमध्ये राहू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 सैनिक पाठवून यिर्मयाहला पहारेकऱ्यांच्या आंगणातून बाहेर आणले व त्याला परत त्याच्या घरी नेण्यासाठी शाफानचा नातू व अहीकामचा पुत्र गदल्याह याच्याकडे सोपविले. मग यिर्मयाह देशामध्ये उरलेल्या त्याच्या लोकांमध्ये राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 39:14
18 Iomraidhean Croise  

मग त्याने हिल्कीया याजक, अहीकाम बिन शाफान, अखबोर बिन मिखाया, शाफान चिटणीस व राजसेवक असाया ह्यांना आज्ञा केली की,


तेव्हा हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान व असाया हे हुल्दा संदेष्ट्रीकडे गेले व तिच्याशी त्यांनी भाषण केले. ती शल्लूम बिन तिकवा बिन हरहस नावाचा जामदार ह्याची स्त्री असून ती त्या वेळी यरुशलेमेच्या दुसर्‍या पेठेत राहत होती.


मग राजाने हिल्कीया, अहीकाम बिन शाफान, अब्दोन1 बिन मीखा, शाफान चिटणीस व राजसेवक असाया ह्यांना आज्ञा केली की,


त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले.


मग यहोयाकीमाने मिसर देशात माणसे पाठवली; त्याने अखबोराचा पुत्र एलनाथान ह्याच्याबरोबर काही माणसे देऊन त्याला मिसर देशात पाठवले.


शाफानाचा पुत्र अहीकाम ह्याचे यिर्मयाला पाठबळ होते म्हणून तो लोकांच्या हाती लागला नाही व त्यांनी त्याला ठार मारले नाही.


त्या समयी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमेस वेढा दिला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजगृहातील पहारेकर्‍यांच्या चौकात बंदीमध्ये होता.


मग सिद्कीया राजाच्या आज्ञेने त्यांनी यिर्मयाला पहारेकर्‍यांच्या चौकात ठेवले आणि नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटारआळीतून रोज त्याला एक भाकर मिळत असे. ह्याप्रमाणे यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.


तेव्हा त्यांनी यिर्मयाला दोरांनी विहिरीतून वर ओढून घेतले. मग यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.


ह्याप्रमाणे यरुशलेम हस्तगत होईपर्यंत यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.


तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने आणि नबूशजबान, रब-सारीस, नेर्गल-शरेसर, रब-माग व बाबेलच्या राजाचे सर्व मुख्य अंमलदार


यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात कैदी होता तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले ते असे :


गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यरुशलेम व यहूदा ह्यांतील जे लोक बंदिवान करून बाबेलास नेले त्या सर्वांबरोबर यिर्मयालाही बेड्या घालून रामा येथे आणले होते; तेथे त्याने यिर्मयाची सुटका केल्यानंतर यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे :


तो परतला नाही तोच तो त्याला म्हणाला, “गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याला बाबेलच्या राजाने यहूदाच्या नगरांवर अधिपती नेमले आहे, त्याच्याकडे परत जा व त्याच्याबरोबर लोकांमध्ये जाऊन वस्ती कर; किंवा तुला सोईचे वाटेल तेथे जा.” मग गारद्यांच्या नायकाने त्याला अन्नसामग्री व इनाम देऊन रवाना केले.


तेव्हा यिर्मया निघून मिस्पा येथे गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे गेला व देशात जे लोक उरले होते त्यांच्यामध्ये जाऊन राहिला.


बाबेलच्या राजाने गदल्या बिन अहीकाम ह्याला देशाचा अधिपती नेमून पुरुष, स्त्रिया, मुले, देशातील सर्व लाचार व ज्या कोणाला पकडून बाबेलास नेले नव्हते ते सर्व त्याच्या स्वाधीन केले आहेत असे जेव्हा रानावनात असलेल्या सेनानायकांनी व त्यांच्या लोकांनी ऐकले,


सातव्या महिन्यात असे झाले की इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा, जो राजवंशातला असून राजाच्या मुख्य अंमलदारांपैकी होता तो व त्याच्याबरोबर दहा माणसे ही गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे मिस्पा येथे आली; मिस्पा येथे ते एका पंक्तीला बसून जेवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan