Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 39:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 “त्याला नेऊन त्याची चांगली व्यवस्था ठेव; त्याला काही इजा करू नकोस; तो तुला सांगेल तशी त्याची व्यवस्था लाव.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 “त्याला घेऊन व त्याची काळजी घे. त्यास इजा करु नको. तो जे काही सांगेल ते त्याच्यासाठी कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “त्याला ताब्यात घेऊन त्याची नीट काळजी घ्या; त्याला काही इजा होऊ देऊ नका व तो मागेल ते त्याला द्या,”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 39:12
12 Iomraidhean Croise  

मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो.


राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.


जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावीस काय? कारण गगनात उडणार्‍या गरुडासारखे पंख धन आपणास लावते.


परमेश्वर म्हणतो, तुझ्या बर्‍यासाठी मी तुला खचीत बळ देईन; अनिष्टाच्या व क्लेशाच्या समयी शत्रू तुझी विनवणी करतील असे मी खचीत करीन.


मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्का-र्‍यांच्या तावडीतून मुक्त करीन.”


मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही.


तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने आणि नबूशजबान, रब-सारीस, नेर्गल-शरेसर, रब-माग व बाबेलच्या राजाचे सर्व मुख्य अंमलदार


आता पाहा, आज तुझ्या हातांत असलेल्या बेड्यांपासून मी तुला मुक्त करतो; तुला माझ्याबरोबर बाबेलास येणे बरे वाटले तर ये, मी तुझी चांगली व्यवस्था ठेवीन; पण माझ्याबरोबर बाबेलास येणे तुला बरे न वाटले तर येऊ नकोस; पाहा, सगळा देश तुझ्यापुढे आहे; तुला बरे व सोईचे वाटेल तिकडे जा.”


आणि ते शत्रूंपुढे पाडाव होऊन गेले असले, तरी तेथे मी तलवारीला आज्ञा करीन म्हणजे ती त्यांना वधील; मी त्यांच्याकडे दृष्टी लावीन, ती त्यांच्या वाइटासाठी असेल, बर्‍यासाठी नव्हे.”


त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडवले आणि ‘मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र’ व ‘ज्ञानी’ असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan