Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 38:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्यांनी यिर्मयाला विहिरीत टाकले असे राजगृहातला कूशी खोजा एबद-मलेख ह्याने ऐकले; त्या प्रसंगी राजा बन्यामिनी वेशीत बसला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आता राजाच्या घरात एबद-मलेख हा एक कुशी षंढ होता. त्यांनी यिर्मयाला पाण्याच्या टाकीत टाकले आहे हे त्याने ऐकले. त्यासमयी राजा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराशी बसला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 यिर्मयाहला राजवाड्यातील अंधार विहिरीत टाकले आहे, हे वृत्त यरुशलेमच्या राजवाड्यातील एबेद-मेलेख नावाच्या एका प्रमुख अधिकार्‍याने ऐकले. तो कूशी देशाचा मूळ रहिवासी होता. यावेळी राजा बिन्यामीन वेशीपाशी बसला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 38:7
22 Iomraidhean Croise  

त्याने यहोयाखीनास बाबेलास नेले; राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे व देशातील मोठमोठे लोक ह्यांना त्याने कैद करून यरुशलेमेहून बाबेलास नेले.


मिसर देशातून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची त्वरा करील.


खुनशी माणसे सात्त्विकाचा द्वेष करतात, पण सरळ माणसे त्याच्या जिवाला जपतात.


जो विदेशी परमेश्वरचरणी जडला आहे तो असे न म्हणो की, “परमेश्वर आपल्या लोकांतून माझा उच्छेद करील;” आणि षंढही न म्हणो की, “मी केवळ शुष्क वृक्ष आहे.”


कूशी माणसाला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील काय? असे घडेल तरच दुष्टतेला सवकलेल्या तुम्हांला चांगले आचरण करता येईल.


तेव्हा पशहूराने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारले आणि परमेश्वराच्या मंदिरातील वरल्या बाजूस बन्यामीनद्वारात खोडे होते त्यांत त्याला अडकवून ठेवले.


तेव्हा सरदार व सर्व लोक याजकांना व संदेष्ट्यांना म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडास पात्र नाही; कारण परमेश्वर आमचा देव ह्याच्या नामाने तो आमच्याबरोबर बोलला आहे.”


यकन्या राजा, राजमाता, खोजे, यहूदाचे व यरुशलेमेचे सरदार, कारागीर व लोहार हे यरुशलेमेतून गेल्यावर ते त्याने पाठवले.


यहूदाचे सरदार व यरुशलेमेचे सरदार, खोजे, याजक व देशातील सर्व लोक वासराच्या दोन भागांतून चालून गेले,


तो बन्यामिनाच्या वेशीत प्रवेश करतो तर तेथे पहारेकर्‍यांचा नायक इरीया बिन शलेम्या बिन हनन्या होता; त्याने यिर्मया संदेष्ट्याला पकडून म्हटले, “तू खास्द्यांकडे फितूर होऊन जात आहेस.”


एबद-मलेख राजगृहातून निघाला व राजाकडे जाऊन म्हणाला,


वेशीत हितबोध करणार्‍यांचा ते द्वेष करतात, सात्त्विकपणे बोलणार्‍याचा वीट मानतात.


तेव्हा सर्व देश यरुशलेमेच्या दक्षिणेस असलेली गेबा व रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरुशलेमेचा उद्धार होऊन बन्यामिनाच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत, कोपरावेशीपर्यंत तसेच हनानेलाच्या बुरुजापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत ते आपल्या स्थळी वसेल.


ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. [कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत.]”


तर त्याच्या आईबापांनी त्याला धरून बाहेर काढून गावाच्या वेशीत चावडीवर गावच्या वडीलवर्गासमोर न्यावे.


असा मनुष्य अशा एखाद्या नगरात पळून आला तर त्याने नगराच्या वेशीजवळ उभे राहावे आणि तेथील वडील मंडळीस आपली हकिकत सांगावी; मग त्यांनी त्याला आपल्या नगरात घेऊन आपल्यामध्ये राहायला जागा द्यावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan