Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 38:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मग राजपुत्र मल्कीया ह्याची पहारेकर्‍यांच्या चौकात विहीर होती, तिच्यात त्यांनी यिर्मयाला नेऊन टाकले; त्यांनी यिर्मयाला दोरांनी खाली उतरवले. त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता; यिर्मया त्या चिखलात रुतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग त्यांनी यिर्मयाला घेतले आणि राजाचा मुलगा मल्कीया याच्या पाण्याच्या टाकीत टाकले. पाण्याची टाकी पहारेकऱ्यांच्या चौकात होती. त्यांनी यिर्मयाला दोरीने खाली सोडले. कैदखानेत पाणी नव्हते पण चिखल होता आणि तो त्या चिखलात रुतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मग त्यांनी यिर्मयाहला बाहेर काढले व त्याला दोरांच्या साहाय्याने राजपुत्र मल्कीयाह याच्या राजवाड्याच्या आवारातील एका अंधार विहिरीत सोडले; त्यात पाणी नव्हते, पण तळाशी खूप गाळ होता आणि यिर्मयाह त्या गाळात रुतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 38:6
19 Iomraidhean Croise  

आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले; तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते.


मी केलेल्या बर्‍याची परतफेड त्यांनी वाइटाने केली, व माझ्या प्रेमाची फेड द्वेषाने केली.


नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली.


मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, आणि लोंढा माझ्यावरून जात आहे.


त्या समयी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमेस वेढा दिला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजगृहातील पहारेकर्‍यांच्या चौकात बंदीमध्ये होता.


तेव्हा राजाने राजपुत्र यमेल, अरहज्रीएलपुत्र सराया, व अब्देलपुत्र शलेम्या ह्यांना अशी आज्ञा केली की बारूख लेखक व यिर्मया संदेष्टा ह्यांना धरून आणावे; पण परमेश्वराने त्यांना लपवले.


यिर्मया तेथल्या तळघरात व अंधारकोठड्यांत राहिला; तेथे त्याने बहुत दिवस काढले.


मग सिद्कीया राजाच्या आज्ञेने त्यांनी यिर्मयाला पहारेकर्‍यांच्या चौकात ठेवले आणि नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटारआळीतून रोज त्याला एक भाकर मिळत असे. ह्याप्रमाणे यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.


तेव्हा त्यांनी यिर्मयाला दोरांनी विहिरीतून वर ओढून घेतले. मग यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.


पाहा, यहूदाच्या राजाच्या घरी ज्या स्त्रिया उरल्या आहेत त्या सर्वांना बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे आणतील आणि त्या म्हणतील, ‘तुझ्या जिवलग मित्रांनी तुला दगा दिला, त्यांनी तुला चीत केले व तुझे पाय चिखलात रुतले असता ते निघून गेले आहेत.’


त्यावर राजाज्ञेवरून दानिएलास आणवून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, “ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवील.”


तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवानांना निर्जल गर्तेतून मुक्त करीन.


त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकवले.


तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हांला सहनशक्तीचे अगत्य आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan