Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 38:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 परमेश्वर म्हणतो, हे नगर खातरीने बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हाती जाईल व तो ते घेईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वर असे म्हणतो ‘हे नगर बाबेल राजाच्या सैन्याच्या हाती दिले जाईल आणि तो ते हस्तगत करेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि याहवेह असे म्हणतात: ‘हे शहर निश्चितच बाबिलोनचे राजाच्या सेनेच्या हाती देण्यात येईल, तो ते हस्तगत करेल.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 38:3
7 Iomraidhean Croise  

कारण मी ह्या नगराकडे तोंड केले आहे ते त्याच्या वाइटासाठी, त्याच्या बर्‍यासाठी नव्हे, असे परमेश्वर म्हणतो; ते बाबेलच्या राजाच्या हाती जाईल, तो त्याला आग लावून देईल.’


‘इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, पाहा, तटाबाहेर तुम्हांला वेढा घालणारा बाबेलचा राजा व खास्दी लोक ह्यांच्याशी ज्या शस्त्रांनी तुम्ही लढत आहात ती मी उलटवीन आणि त्यांना ह्या नगरामध्ये एकत्र करीन.


ह्या नगरात जो राहील तो तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल; जो बाहेर जाऊन तुम्हांला वेढा घालणार्‍या खास्द्यांना मिळेल तो जगेल, जिवानिशी सुटेल.


पण दाविदाच्या सिंहासनावर बसलेल्या राजांविषयी व ह्या नगरात राहणारे सर्व लोक, म्हणजे अर्थात तुमचे बांधव तुमच्याबरोबर बंदिवान होऊन गेले नाहीत त्यांच्याविषयी सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो :


खास्दी लोक परत येऊन ह्या नगराशी लढतील व ते घेऊन अग्नीने जाळतील.


पण तू बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे न गेलास तर हे नगर खास्दी लोकांच्या हाती देण्यात येईल, ते नगर ते अग्नीने जाळतील व तू त्यांच्या हातून सुटणार नाहीस.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan