Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 38:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 मग त्या सर्व सरदारांनी यिर्मयाकडे येऊन विचारले, तेव्हा राजाने त्याला जे शब्द बोलण्याची आज्ञा केली होती त्या सर्व शब्दांनी त्याने त्यांना उत्तर दिले. ते त्याच्याबरोबर आणखी काही बोलले नाहीत; कारण त्यांना ही गोष्ट समजली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 नंतर सर्व अधिकारी यिर्मयाकडे आले आणि त्यांनी त्यास प्रश्न विचारले आणि त्याने उत्तर दिले, राजाने सूचना केल्याप्रमाणे त्याने उत्तरे दिली. मग त्यांनी त्याच्याशी बोलणे थांबवले कारण त्यांनी यिर्मया व राजा यांच्यात झालेले संभाषण ऐकले नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 सर्व नगराधिकारी यिर्मयाहकडे आले व त्याला प्रश्न विचारू लागले. तेव्हा राजाने आज्ञापिल्याप्रमाणे यिर्मयाहने त्यांना सांगितले. मग त्यांनी त्याला काहीही विचारले नाही व राजाशी त्याचा झालेला संवाद कोणीही ऐकला नव्हता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 38:27
7 Iomraidhean Croise  

अलीशा त्यांना म्हणाला, “हा रस्ता नव्हे तो रस्ता व हे नव्हे ते शहर; माझ्यामागून या म्हणजे ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करत आहात त्याच्याकडे मी तुम्हांला घेऊन जाईन.” मग तो त्यांना शोमरोनात घेऊन गेला.


पण मी तुझ्याबरोबर बोललो असे ऐकून सरदार तुझ्याकडे आले व तुला म्हणाले की, ‘तू राजाशी काय बोललास ते आम्हांला सांग; आमच्यापासून काही लपवू नकोस, आम्ही तुला ठार मारणार नाही; राजा तुला काय बोलला तेही सांग;’


तर तू त्यांना म्हण, राजाने मला योनाथानाच्या घरी मरण्यास परत पाठवू नये असा मी त्याला अर्ज केला.”’


ह्याप्रमाणे यरुशलेम हस्तगत होईपर्यंत यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.


तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, “बंधुजनहो, मी परूशी व परूश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan