Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 38:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 पाहा, यहूदाच्या राजाच्या घरी ज्या स्त्रिया उरल्या आहेत त्या सर्वांना बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे आणतील आणि त्या म्हणतील, ‘तुझ्या जिवलग मित्रांनी तुला दगा दिला, त्यांनी तुला चीत केले व तुझे पाय चिखलात रुतले असता ते निघून गेले आहेत.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 यहूदाच्या घरात ज्या स्त्रिया मागे राहिल्या आहेत त्या सर्वांना बाहेर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे आणले जाईल. नंतर पाहा! त्या स्त्रिया तुला म्हणतील, तुला तुझ्या मित्रांनी फसवले आहे; त्यांनी तुझा नाश केला आहे. तुझे पाय आता चिखलात रुतले आहेत आणि तुझे मित्र पळून गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— ते तुझे विश्वसनीय मित्र. तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; त्यांनी टाकून दिले आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 38:22
22 Iomraidhean Croise  

माझे बांधव ओढ्याप्रमाणे दगा देणारे झाले आहेत ते आटणार्‍या ओहोळाच्या पात्राप्रमाणे झाले आहेत;


जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे.


चिखलातून मला काढ, मला रुतू देऊ नकोस; मला माझ्या द्वेष्ट्यांपासून मुक्त कर व खोल पाण्यातून मला काढ.


मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, आणि लोंढा माझ्यावरून जात आहे.


जे कोरीव मूर्तींवर भाव ठेवतात, ओतीव मूर्तींना “तुम्ही आमचे देव आहात” असे म्हणतात, ते उलथून पडतील व अगदी लज्जित होतील.


ज्यांचा स्नेह संपादन करण्याचा प्रयत्न तू केला त्यांना त्याने तुझ्या शिरावर ठेवले तर तू काय म्हणशील? प्रसववेदना लागलेल्या स्त्रीप्रमाणे तुला क्लेश होणार नाहीत काय?


कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”


जे संदेष्टे तुम्हांला सांगतात की, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करू नका’ त्यांची वचने ऐकू नका; कारण ते तुम्हांला खोटा संदेश देतात.


परमेश्वर म्हणतो, मी त्यांना पाठवले नाही, पण ते माझ्या नामाने खोटा संदेश देतात; ह्यास्तव मी तुम्हांला व तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांना हाकून देईन आणि तुम्ही नष्ट व्हाल.”


सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “जे यहूदी फितून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते की ते मला त्यांच्या स्वाधीन करून माझा उपहास करतील.”


पण तू निघून जाण्यास नाकबूल असलास तर परमेश्वराने मला प्रकट केलेले वचन हे आहे :


तेव्हा इश्माएलाने मिस्पा येथे असलेले सर्व अवशिष्ट लोक पकडून नेले; राजकन्यांना व मिस्पा येथे राहिलेल्या सर्व लोकांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम ह्याच्या स्वाधीन केले होते त्यांना नेले; इश्माएल बिन नथन्या ह्याने त्यांना बंदिवान करून नेले व तो अम्मोनी लोकांकडे जाण्यास निघाला.


पुरुष, स्त्रिया, मुले, राजकन्या ह्यांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या हवाली केलेल्या सर्व लोकांना आणि यिर्मया संदेष्टा आणि बारूख बिन नेरीया ह्यांना त्यांनी नेले.


तिचे भाडोत्री शिपाईही तिच्यामध्ये लठ्ठ वासरांसारखे आहेत; ते आपली पाठ फिरवून सगळेच पळून जातात; ते तोंड देत नाहीत, कारण त्यांच्या नाशाचा दिवस, त्यांच्या पारिपत्याचा समय त्यांच्यावर आला आहे.


माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत; चोहोकडे भीतीच भीती आहे, असे परमेश्वर म्हणतो.


त्यांची घरे, शेते व स्त्रिया ही सर्व दुसर्‍यांच्या हाती जातील; मी आपला हात देशाच्या रहिवाशांवर उगारीन,” असे परमेश्वर म्हणतो.


ह्यामुळे मी त्यांच्या स्त्रिया इतरांना देईन, त्यांची शेते नव्या वहिवाटदारांना देईन; कारण लहानापासून थोरापर्यंत ते झाडून सर्व लोभवश झाले आहेत; संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत ते सर्व कपट करतात.


त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली; त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले; त्याने मला उजाड, सदा कोमेजलेली असे केले आहे.


ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.


त्यांनी सीयोनेतील स्त्रिया, यहूदाच्या नगरातील कुमारी, भ्रष्ट केल्या आहेत.


सोबत्याचा भरवसा धरू नकोस, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नकोस, तुझ्या उराजवळ निजणार्‍या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan